जीवनशैलीत चारित्र्याचा मंचक प्रस्थापित हवा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:21 PM2020-01-31T12:21:27+5:302020-01-31T12:21:32+5:30

उच्च स्तरांवरील चैतन्य हा मानवाचा वारसा आहे.

Lifestyle platform should be installed ...! | जीवनशैलीत चारित्र्याचा मंचक प्रस्थापित हवा...!

जीवनशैलीत चारित्र्याचा मंचक प्रस्थापित हवा...!

Next

आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा आपले चारित्र्य हा एक मूलभूत पाया आहे. चारित्र्य म्हणजे नेमके काय आहे? चारित्र्य हे प्रत्येकाच्या आपल्या मानसिक आणि नैतिक गुणांचा विशेष वैयक्तिक संचय आहे. माझे गुरु, शिवाय शुभ्रमुनीयस्वामी यांनी असे अवलोकन केले आहे की:
सत्यानंद ध्यानामुळे प्राप्त होतो हे सत्य आहे, आणि उच्च स्तरांवरील चैतन्य हा मानवाचा वारसा आहे हे ही सत्य आहे. तथापि, दहा यम आणि त्यांना अनुसरून दहा नियम यांची आपल्या सत्यानंदाची चेतना कायम राखण्यासाठी आवश्यकता आहे. त्याचप्रमाण? कुठल्याही जन्मांत आपल्या स्वत:बद्दल आणि इतरांबद्दल उत्तम भावना असणेही आवश्यक आहे. हे यम आणि नियम आपले चारित्र्य घडवतात. चारित्र्य हे आध्यात्मिक प्रगतीचा पाया आहे. वस्तुस्थिति ही आहे की, जेवढे आपण उच्च स्तरावर पोहोचू, तेवढेच आपण अधोगतीला जाणे शक्य आहे.

आपल्या शरीरांतील वरची चक्रे गतीने फिरत असतात, तर खालची चक्रे अधिक गतीने भ्रमण करीत असतात. अध्यात्म मार्गावर चिकाटीने प्रगती करण्यासाठी आवश्यक असणारी संतुष्ट वृत्ति कायम करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत चारित्र्याचा मंचक प्रस्थापित केलाच पाहिजे. या थोर ऋषींनी मानवी स्वभावाच्या दुर्बलतेचे अवलोकन केले आणि त्यांनी आपला स्वभावधर्म सुदृढ करण्यासाठी हे मार्गदर्शन किंवा हे नियम आपणास पालन करावयास दिले. ते म्हणाले: प्रयत्न करा! दुसºयांना न दुखवण्याचा, सत्यवचनी असण्याचा आणि त्यांनी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याचा चिकाटीने प्रयत्न करु या.
- श्री. विद्यानंद महास्वामी, सोलापूर

Web Title: Lifestyle platform should be installed ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.