येत्या शुक्रवारी छायाकल्प चंद्रग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 06:00 AM2020-01-08T06:00:02+5:302020-01-08T06:00:09+5:30

या नूतन वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण येत्या शुक्रवारी १० जानेवारी रोजी पौष शाकंभरी पौर्णिमेच्या रात्री होणार

 Lunar eclipse this coming Friday | येत्या शुक्रवारी छायाकल्प चंद्रग्रहण

येत्या शुक्रवारी छायाकल्प चंद्रग्रहण

Next

मुंबई : या नूतन वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण येत्या शुक्रवारी १० जानेवारी रोजी पौष शाकंभरी पौर्णिमेच्या रात्री होणार असून, ते संपूर्ण भारतातून दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
याविषयी सोमण म्हणाले की, ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेमध्ये येते त्यावेळी छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण दिसते. शुक्रवार, १० जानेवारी रोजी रात्री १०-३८ वाजता चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येण्यास प्रारंभ होईल. रात्री १२-४० वाजता जास्तीत जास्त म्हणजे ८९ टक्के चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येईल. उत्तररात्री २-४२ वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेतून बाहेर पडेल.
हे चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी पाहता येईल. पौर्णिमा असूनही ग्रहणात चंद्रबिंब कमी तेजस्वी दिसेल. हे छायाकल्प चंद्रग्रहण उत्तर अमेरिकेचा उत्तर पश्चिम भाग, आशिया, आॅस्ट्रेलिया, यूरोप आणि दक्षिण अमेरिकेचा पूर्व भाग येथून दिसेल, असेही सोमण यांनी सांगितले.

Web Title:  Lunar eclipse this coming Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.