आनंद तरंग - पैशाचं झाड?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 12:36 AM2020-08-07T00:36:33+5:302020-08-07T00:37:02+5:30

जमिनीवरून चंद्राला पाहिलं, तर चंद्र जवळ दिसतो; पण तो भ्रम असतो. आपल्याला दिसतं, वाटतं तसं वास्तव नसतं, त्यापेक्षा ते कितीतरी पटीने वेगळं असतं

Money tree? | आनंद तरंग - पैशाचं झाड?

आनंद तरंग - पैशाचं झाड?

googlenewsNext

विजयराज बोधनकर

मोजूनमापून अक्षरे लिहिली म्हणून त्याला लेखन म्हणायचं का? लेखनासाठी आयुष्य खर्ची घालावं लागतं! चार जवळच्यांनी कौतुक केलं म्हणून त्याला यश म्हणायचं का? यश मिळविण्यासाठी व टिकविण्यासाठी आयुष्यभर जागृत राहावं लागतं. भगवे कपडे घातले म्हणजे तो संत होतो का? संत बनण्यासाठी मोहाचे, लोभाचे दरवाजे बंद करावे लागतात, तसंच आंब्याच्या झाडालासुद्धा आंबे लागायला झाड मालकाला ते वाढवावं लागतं. प्रतीक्षेनंतर रसाळ फळे लागतात. कुठल्याही स्पर्धेत अव्वल येण्यासाठी त्या विषयात खूप मेहनत घ्यावी लागते. स्वप्नात चटकन् मिळणारं यश वास्तवात चटके देऊन जातं.

जमिनीवरून चंद्राला पाहिलं, तर चंद्र जवळ दिसतो; पण तो भ्रम असतो. आपल्याला दिसतं, वाटतं तसं वास्तव नसतं, त्यापेक्षा ते कितीतरी पटीने वेगळं असतं. कुठल्याही यशस्वी माणसाला विचारलं की तुम्ही यश मिळविण्यासाठी नेमकं काय केलं, तर तो इतकंच म्हणेल की, मी सतत निरपेक्ष कर्म, सखोल अभ्यास व टोकाची मेहनत केली. याला या जगात पर्याय नाही. जे मेहनतीशिवाय यश मिळतं ते फार काळ टिकत नाही. आजही यशाबद्दल असे अनेक अधांतरी प्रश्न आहेत. याविषयी समज-गैरसमज कमी वयातच निकालात निघाले, तर नेमकं सत्य आहे तरी काय, याची जाणीव होऊ शकते. कुठल्या गोष्टीला बुद्धिसमर्पित वृत्ती हवी, याचा अंदाज आला की, मोठं आकाश हाताशी येऊ लागतं. ईश्वरभक्ती व कर्मभक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी खूप क्षेत्रे आहेत, ज्यात पटकन् यश तर मिळतं व पुढे मेहनत कमी पडली की अपयश दाराशी उभं राहतं. अपयशी माणसे जगासमोर येत नाहीत, म्हणून अपयश आपल्याला दिसत नाही; पण ते असतं आणि नेमकं यश जगापुढे येतं व अस्सल असेल तेच दिसतं, जसे पैशाचे झाड अद्याप जन्माला आले नाही, तसे शंभर टक्के यश मिळवून देणारे विद्यालय जन्माला आले नाही. ते यशाची हमी देत नसते. कारण आपल्या स्वानुभवाच्या विद्यालतातूनच आपल्या जागृत कर्माने यश मिळते.

Web Title: Money tree?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.