नाथ म्हणजे ज्ञानवैराग्याचे भांडार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 02:42 AM2019-03-27T02:42:54+5:302019-03-27T02:43:08+5:30
‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची निर्मिती. परकीय आक्रमणामुळे हवालिदल झालेल्या, स्वत्व विसरून गेलेल्या लोकांच्या मनात अन्यायाविरुद्ध चीड निर्माण करण्यासाठी दुष्ट रावणाची रामाने कशी खोड मोडली, याचे सकस वर्णन करून नाथांनी जनजागरणाचे मोठे कार्य केले.
- शैलजा भा. शेवडे
भजा हो भजा माझ्या एकनाथासी,
त्रिकाळी श्रीदत्तात्रेयदर्शन ज्यासी,
प्रतिष्ठान, अधिष्ठान मान्य सर्वांसी,
प्रकट परब्रह्म भानुदासाचे वंशी ।
मुक्तेश्वरांनी संत एकनाथांचे किती सुंदर वर्णन केले आहे. नाथ म्हणजे शांतिब्रह्म. करुणेचा अवतार. नाथ म्हणजे सद्गुरूचा महिमा. नाथ म्हणजे गुरुभक्ती. नाथ म्हणजे भागवत. नाथ म्हणजे ज्यांच्या घरी प्रत्यक्ष कमलापती श्रीखंड्याच्या रूपात ज्यांच्या घरी पाणी भरत होते, अशी विभूती. नाथ म्हणजे भावार्थ रामायण. नाथ म्हणजे सद्गुरू भक्तीचा शृंगार. नाथ म्हणजे ज्ञानवैराग्याचे भांडार, नाथ म्हणजे सच्चिदानंद एकाकार.
‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची निर्मिती. परकीय आक्रमणामुळे हवालिदल झालेल्या, स्वत्व विसरून गेलेल्या लोकांच्या मनात अन्यायाविरुद्ध चीड निर्माण करण्यासाठी दुष्ट रावणाची रामाने कशी खोड मोडली, याचे सकस वर्णन करून नाथांनी जनजागरणाचे मोठे कार्य केले. या दोन ग्रंथांशिवाय नाथांनी शुकाष्टक, रुक्मिणी स्वयंवर, आनंदलहरी, गीतासार, हस्तामलक, स्वात्मसुख गाथा असे एकापेक्षा एक लोकप्रिय ग्रंथ लिहिले. गाथेमध्ये अभंग, भारूड, गुरुस्तुती असे अनेक प्रकार आलेले आहेत. या सर्व ग्रंथांचा विचार केला, तर नाथांनी लिहिलेल्या एकंदर पदांची संख्या जवळजवळ ७५ हजार एवढी प्रचंड होते. यावरून नाथांच्या प्रगल्भ प्रतिभेची कल्पना येते. नाथांनी भागवतातील एकादश स्कंध मराठीत ओवी रूपात लिहिला, तेव्हा त्यांच्यावर टीका झाली, पण नाथांनी त्यांना उत्तर दिले,
संस्कृत भाषा देवे निर्मिली, प्राकृत का ती, चोरे रचिली.
वारकरी संप्रदायात भागवताची पारायणे केली जातात.
नाथांसारखे महात्मे अठरा जातीचे, सर्व लोकांचे धर्मगुरू.