Navratri 2018 : नवरात्रीमध्ये जवस-ज्वारी का उगवले जातात?, जाणून घ्या महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 11:46 AM2018-10-15T11:46:30+5:302018-10-15T11:52:05+5:30
Navratri 2018 :आदिमाया, आदिशक्ती दुर्गामातेच्या मूर्तीची ‘उदे गं अंबे उदे’च्या जयघोषात प्रतिष्ठापना करण्यात आली. घरोघरी घटस्थापनेनंतर नवरात्रास उत्साही वातावरणात प्रारंभही झाला.
आदिमाया, आदिशक्ती दुर्गामातेच्या मूर्तीची ‘उदे गं अंबे उदे’च्या जयघोषात प्रतिष्ठापना करण्यात आली. घरोघरी घटस्थापनेनंतर नवरात्रास उत्साही वातावरणात प्रारंभही झाला. घटस्थापनेसाठी मातीच्या मोठ्या भांड्यात शेतातील काळी माती, करडई, ज्वारी, जवस, उडीद, मूग, हरभरा, गहू आदी धान्य पेरण्यात येते आणि त्यावर कलश ठेवला जातो. नऊ दिवस देवीसमोर घटमांडणी केली जाते. स्थापना करण्यात आलेल्या घटामध्ये धान्यांची पेरणी का केली जाते?, ही धान्य का उगवली जातात?, याचे महत्त्व खूपच कमी जणांना माहिती आहे.
(Navratri 2018 : बापरे ! 4 कोटी रोकड आणि 4 किलो सोन्यानं देवीच्या मंदिराची अनोखी सजावट)
चला तर मग जाणून घेऊया घटनास्थापनेचे महत्त्व
माहितीनुसार, जवस हे धरतीवर सर्वात पहिलं उगवण्यात आलेले पीक. शिवाय, अन्न हे ब्रह्म देवतेचे एक स्वरुप असल्याचीही मान्यता आहे. तसंच नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी महागौरीच्या पूजेमध्ये अन्नाचे विशेष महत्त्व असते. या कारणामुळे काशीमध्ये नवगौरी यात्रेदरम्यान आठवी देवी म्हणजे महागौरीचे दर्शन अन्नपूर्णा मंदिरात होते, असे म्हटले जाते. नवरात्रीत जसे-जसे जवस-ज्वारी वाढत जाते, तसे-तसे घरामध्ये देवीची कृपा तेवढीच वाढते. जवस-ज्वारी जेवढे हिरवेगार होईल, तेवढीच घरातील सुख-समृद्धी येणाऱ्या काळात वाढत जाईल, असे मानले जाते.
(सहावी माळ - भक्तीरूपी उपासना म्हणजे परिश्रमानंतरचे ज्ञान)
नवरात्रीदरम्यान देवी दुर्गाच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.
1. देवी शैलपुत्री
2. देवी ब्रह्मचारिणी
3. देवी चंद्रघण्टा
4. देवी कुष्मांडा
5. देवी स्कंदमाता
6. देवी कात्यायनी
7. देवी कालरात्री
8. देवी महागौरी
9. देवी सिद्धिदात्री
या सर्व देवींची पूजा आणि नैवेद्य वेगवेगळ्या पद्धतीनं केले जातात. पण सर्वांच्या पूजेमध्ये जवस आणि कलश समानच असतो.