Navratri : दुर्गे शक्तिरूपे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 05:30 AM2019-10-03T05:30:55+5:302019-10-03T05:31:08+5:30
समर्थांनी ‘शक्तिरूपे जगन्माता वर्तते जगदंतरी’ असे म्हणत देवीस्वरूपाची व्यापकता स्पष्ट केली आहे. नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.
- शैलजा शेवडे
समर्थांनी ‘शक्तिरूपे जगन्माता वर्तते जगदंतरी’ असे म्हणत देवीस्वरूपाची व्यापकता स्पष्ट केली आहे. नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. दुर्गा म्हणजे दु:ख दूर करणारी. तिची नऊ रूपे वर्णन करणारी कविता मी केली आहे.
भावभक्तीने भिजतो तुजला, दुर्गे, शक्तीरूपे,
करीन जप तव नामांचा मी, निश्चित गूढ रूपे ।
शैलपुत्री तू, वृषारूढा, प्रथम तुला नमितो,
शूलधरा, तू, अनंतशक्ती, कृपा तुझी इच्छितो ।
ब्रम्हचारिणी, तव करकमली, कमंडलू अक्षमाला,
तेजोमयी तू सर्विसद्धी दे, निश्चय दे आम्हाला।
चंद्रघंटा सिंहारु ढा, खड्गधारी, स्वर्णमयी,
अर्धचंद्र शिरी घंटाकारी, दशभूजा शुभमयी।
कुष्माण्डा तू, ब्रम्हांडाला हास्यातून निर्मिसी,
अष्टभुजा, सिंहारु ढा, व्याधी नष्ट करसी।
स्कंदमाता, सिंहासनी तू, स्कंदासह बसशी,
शुभ्रवरणा, चतुर्भुजा तू, यश आम्हां देसी।
कात्यायनी तू पापहारिणी, अमोघफलदायिनी,
अभय देसी, भक्तांना तू, शार्दुलवरवाहिनी ।
कालरात्री, तू गर्दभवाहिनी, त्रिनेत्रा कालिके,
रूप भयंकर, परी भक्तांना भयमुक्त करते।
महागौरी तू अष्टवर्षा, श्वेता, श्वेतांबरा,
पूर्वसंचित पाप हरसी, सौम्या, अश्वारूढा।
सिद्धीदात्री, हाती तव,गदा, पुष्प,शंख चक्र ,
पूर्ण करसी कामना, हो परिमसद्ध साधक।
साधक नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून उपासनेला, साधनेला प्रारंभ करतात. पहिल्या दिवशी मूलाधार चक्रात आपल्या मनाला स्थिर करतात. शैलपुत्रीला आवाहन करतात. दुसऱ्या दिवशी स्वाधिष्ठान चक्रात स्थिर करणाºयावर ब्रम्हचारिणी या रूपाची कृपा होते. तिसºया दिवशी दुर्गेच्या तिसºया रूपाचे, शक्तीचे साधकाकडून पूजन होते. त्याचे मन मणिपूर चक्र ात प्रविष्ट होते.