पूर्वोत्तर क्षण दुर्लभ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 05:38 AM2019-09-17T05:38:02+5:302019-09-17T05:38:07+5:30

कधीतरी सुखाचा गोड क्षण भेटतो त्याला स्थिर करता आलं पाहिजे़ हेच सूत्राला अपेक्षित आहे़

Northeast moments rare | पूर्वोत्तर क्षण दुर्लभ

पूर्वोत्तर क्षण दुर्लभ

Next

- बा. भो. शास्त्री
कधीतरी सुखाचा गोड क्षण भेटतो त्याला स्थिर करता आलं पाहिजे़ हेच सूत्राला अपेक्षित आहे़ मागची खंत व पुढची चिंता या फटीत आपण जगतो़ म्हणून दु:खी असतो़ प्रथम भेटलेला सुखाचा क्षण शेवटच्या क्षणाला जोडणं हे सोपं नाही़, ते दुर्लभ आहे़
‘‘याजसाठी केला होता अट्टाहास
शेवटचा दिन गोड व्हावा’’
हा अट्टाहास महत्त्वाचा आहे़ हाच निर्धार समजला पाहिजे़ ध्येय गाठल्याशिवाय थांबायचे नाही़, ही प्रतिज्ञा सूत्रात अपेक्षित आहे़
‘पूर्वोत्तर क्षण दुर्लभ’
या गोड सूत्रात स्वामींनी धन व कणाचं महत्त्व व्यवहारासाठी मान्य केलं, पण ते दुर्लभ नाही़ क्षण दुर्लभ आहे़ पैशाने मानवनिर्मित सर्वच वस्तू आपण खरेदी करू शकतो़ पण गेला क्षण विकत मिळत नाही़ श्वास व विश्वासाचं मार्केट नसतं़ जीवन असंख्य क्षणांच्या समूहाने ते बनलेलं आहे़ दहा रुपये हरवले तर आपण दु:खी होतो़, पण एका क्षणात लाभणारी सुवर्णसंधी सजग नसल्याने निघून जाते, तेव्हा खंत वाटत नाही़ इथंच आपलं नियोजन चुकलेलं असतं़
श्रीचक्रधरांनी आपल्या सूत्रात चांगल्या व वाईट क्षणांचा परिचय करून दिला आहे़ क्षणात अपघात घडतो़ हत्या बलात्काराचा एक क्षणाने आरंभ होतो व कुठल्या तरी क्षणाने संपतो़ या दोन क्षणांतले आपण खूप वाईट असतो़ गोळी झाडायला अथवा बॉम्ब टाकायला क्षणाचा काळ लागतो़ त्यामुळे हिंसा होते. त्याचे दुष्परिणाम हजारो वर्षे भोगावे लागतात़ अविचाराचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो. म्हणूनच प्रत्येक क्षणाला विचाराने कृती करणे आवश्यक असते, ही बाब प्रत्येकाने लक्षात घेऊन तशी कृती करणे हेच महत्त्वाचे होय.

Web Title: Northeast moments rare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.