अभिमान नव्हे, आनंद हाच परमात्मा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:25 PM2019-03-01T13:25:54+5:302019-03-01T13:26:45+5:30
सोलापूर : अभिमान हा परमात्मा नसून आनंद हा परमात्मा आहे. श्रद्धेचा संबंध विश्वासाशी असतो. जीवनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह ...
सोलापूर : अभिमान हा परमात्मा नसून आनंद हा परमात्मा आहे. श्रद्धेचा संबंध विश्वासाशी असतो. जीवनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह यासह मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक असणारी श्रद्धा ही आवश्यक आहे. विवेकाने ज्या गोष्टी केल्या जातात, त्याला धर्म असे म्हणतात, असे मत पं. मदनमोहन महाराज यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना महाराज म्हणाले की, आपला सनातन धर्म खूप महान आहे. येथे आनंदाला राम, कृष्ण आणि शिव असेही संबोधले जाते. हिमालय, कैलास तसेच धार्मिक क्षेत्रांवर त्यासोबत ती राहू शकतात ज्यांची बºयाच वर्षांची आणि बºयाच जन्माची ईश्वर तपस्या असते. यासाठी अंतर आत्म्यातील देवत्वाचा विकास करणे गरजेचे आहे. भारत हा संस्कृती, धर्म जपणारा एकमेव देश आहे. भगवान शंकराचा परिवार याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.
या परिवारातील प्रत्येक सदस्याचे वाहन एकमेकांचे शत्रू आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्येही गुण्यागोविंदाने कसे राहावे याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्याला शिवचरणमध्ये प्रेम नाही त्याला रामभक्ती करण्याचा अधिकार नाही. व्यक्ती जितका सरळ असतो तितकाच तो सफल होतो. खरी शांती मिळण्यासाठी भ्रांतीपासून मुक्ती मिळवून देणारा तो ईश्वर आहे.
सृष्टी बदलण्याची गरज नाही आपली दृष्टी बदलावी. मातीपासून बरेच काही बनवता येते परंतु माती बनवता येत नाही. तसेच माणसाकडून माणूस तयार करता येईल परंतु माणुसकी असणारा व ईश्वर तत्त्व मानणारा माणूस बनवू शकत नाही. आपले सत्कर्मच आपल्याकडे संतान बनून येतात. त्यामुळे आपले कर्म चांगले असावे. आपण मानसिक रोगांपासून दूर राहू असे विचार त्यांनी व्यक्त केले.