श्रेष्ठ मूल्यांचे कर्माचरण, हेच परमेश्वराचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 01:46 PM2018-09-30T13:46:53+5:302018-09-30T13:47:56+5:30
प्रत्येकाला प्राप्त झालेले जीवन अतिशय मर्यादित आहे. कोणत्या वेळी काय होईल हे काहीच सांगता येत नाही. म्हणून प्राप्त झालेल्या मर्यादीत आयुष्याचा उपयोग विधायक पध्दतीने होणे आवश्यक आहे. जीवनात निकोप दृष्टीकोण वर्धिष्णु व्हावा हा विचार करायला हवा. संत प्रबोधन करतांना वारंवार सांगतात. ‘घटका गेली पळे गेली, तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो, राम काटे म्हणाना’ प्रत्येक क्षण गतीने पुढे जात आहे. जीवनातील काळही कमी होत आहे. वेळेचे महत्व जाणून सत्कार्याला लागणे आवश्यक आहे. श्रींच्या मंदिरात गेल्यावर त्याच्यापुढे विनम्र होवून, सर्व भावे शरण जाण आणि मग त्याला प्रपंचातील विविध समस्या मिटाव्यात म्हणून काहीतरी मागणी करणे ही मानवी मनाची दुर्बलताच आहे. दु:ख बांदवडी अशा संसारात वारंवार दु:खाची अनुभूति होते. अशावेळी दु:ख पेलण्याचे सामर्थ्य देणारे विश्वप्रभु आहेत. त्या प्रभुचे भावपूर्वक ध्यान, चिंतन मनन करणे आणि सामाजिक जीवनात सदाचारण करणे हेच खरे ईश्वराचे पूजन आहे. मनातील स्वार्थी लोभी विचार नष्ट झाल्याशिवाय विश्वनियंता दर्शन देत नाही हे संतांनी वारंवार प्रगट केले आहे.
थोरपण पºहा सांडीजे, न्युलत्ती लाघवी विसरीजे
जै जगा धाकुटी होई जे, तै जवळीक माझी.
ह्या ज्ञानेश्वर माऊलीच्या उक्तिनुसार लौकिक दृष्ट्या अती नम्र आणि रिक्त होवून प्रभुजवळ गेले पाहिजे. अयोध्येतील मंत्री सुमंत ह्याच पध्दतीने श्रीरामाजवळ गेले. राम भेटीला जातांना सात प्रकारचे दरवाजे त्यांनी ओलांडले, तेव्हा श्रीरामाची भेट झाली. पहिल्या दरवाज्यात सुमंताने रथ सोडला. दुसऱ्या दरवाजात सोबत नेलेली छत्रचामरे सोडली. तिसºया दरवाज्यात पादत्राणे, चौथ्या दरवाज्यात अर्थ, पाचव्या दरवाज्यात स्वार्थ, सहाव्या दरवाज्यात ‘मी तू अहंभावाचा त्याग तेव्हाची भेट श्रीराम, मुख्य परमार्थ ह्या नाव. मी पण टाकल्याशिवाय ईश्वराची जवळीक होत नाही.
अहंभाव गेला, तुका म्हणे देव झाला.
जीवनाच्या सार्थकतेसाठी उत्साहाने सदाचारण करावे. सुंदर जीवन हे गुणात्मक दृष्ट्या अधिक फुलेल. सामाजिक जीवनात सद्विचाराचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न व्हावा.
‘सुख सगळ्यांचे ते सुख माझे, विवेक काही करता यावा, ते अवलोकन ते सावधपण, सदाचार हा सवयीचा व्हावा’ आपण व्यवहारी माणसे. पैशामागे प्रतिष्ठेमागे,प्रसिध्दीसाठी तोंडात फेस येईपर्यंत सारखे धावत असतो. एक धावतो म्हणून दुसरा धावतो. कोठे थांबावे याचा कोणी विचारच करत नाही. आणि शेवटी थकून गेला की मग ईश्वराचे स्मरण करतो. उशिरा सुचलेले ते शहाणपण असते. आज इमारतीची उंची वाढत चालली. परंतु माणसाची उंची कमी होत आहे. संतांचा विचार जोपासल्याशिवाय जीवनाचा मार्ग आनंददायी होणार नाही म्हणून संत म्हणतात.
सदाचार हा थोर सांडू नयेतो, जगी तोची तो मानवी धन्य होतो, श्रेष्ठतम जीवनमूल्य परमार्थाचा विचार आहे. संपूर्ण गीतार्थाचे सार असणारा श्लोक भगवान गोपालकृष्ण सांगतात हे अर्जुना! माझ्यासाठीच कर्म करणारा, मत्परायण आणि माझाच भक्त संपूर्णपणे आसक्ती रहित असतो. तो भक्त मला प्रिय असतो.
मत्कर्म कृन्मत परमो, मदभक्त: संगवर्जित:
निर्वेर: सर्वभूतेषु य:से मामेति पांडवा।।
- हभप डॉ.ज्ञानेश्वर मिरगे, शेगाव