एका जनार्दनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:30 PM2019-04-01T13:30:12+5:302019-04-01T13:30:35+5:30
माउली ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली तेव्हा नुकतेच कुठे मोगलांचे आगमन होऊ घातले होते. मुहम्मद घोरी हा शूर होता. महम्मद गझनीनंतर हिंदूस्थानावर एकामागून एक अशा लागोपाठ स्वा-या करणारा पुरुष हाच होय.
मेलबोर्न , आॅस्ट्रेलिया : माउली ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली तेव्हा नुकतेच कुठे मोगलांचे आगमन होऊ घातले होते. मुहम्मद घोरी हा शूर होता. महम्मद गझनीनंतर हिंदूस्थानावर एकामागून एक अशा लागोपाठ स्वा-या करणारा पुरुष हाच होय. राज्यविस्तार करण्याच्या हेतूनेच त्याने स्वा-या केल्या होत्या. ११७५ मध्ये त्याने हिंदुस्थानवर पहिली स्वारी करून मुलतान पादाक्रांत केला. ११७६ ते १२०५ पर्यंत त्याने व त्याच्या सेनापतींनी गुजरात, पंजाब, ग्वाल्हेर, मीरत, दिल्ली, बुंदेलखंड, बिहार आदींवर अनेक स्वा-या केल्या. तेथील हिंदूंची मंदिरे उदध्वस्त केली. याच कालावधीमध्ये १२ व्या शतकामध्ये यादववंशिंय राजा कृष्णदेवराय यांचा मुलगा रामदेवराय याचे राज्य होते व त्याची राजधानी दौलताबाद होती. हा राजा न्यायी होता. प्रजाहितदक्ष होता व धार्मिक होता. ज्याचे वर्णन संतांनी केले त्याची कारकीर्द निश्चितच चांगली असली पाहिजे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या राजकारीता ज्ञानेश्वरीमध्ये स्वतंत्र ओवी टाकली आहे. त्याची दखल घेतली आहे. तेथ यदुवंश विलसू जो सकळकलानिवासु न्यायाते पोषी क्षितीषु श्री रामचंद्रे ज्ञानेश्वरी पण हा राजा मात्र दुदैर्वाने १२९६ मध्ये झालेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या आकस्मिक हल्ल्यास रामचंद्र तोंड देऊ शकला नाही. इ.स. १३२७ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने दख्खन प्रांतात प्रवेश करून यादवांचा पराभव केला आणि त्यांची संपत्ती लुटून त्यांना दरिद्री बनवले. सेनापती मलीक कफूर याने अल्लाउद्दीनचे काम पुढे चालू ठेवले आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली.
अशा या मोगली धामधुमीमध्ये श्री ज्ञानेश्वरी महाराजानंतर साधारणपणे २५० वर्षांनी श्री संत एकनाथ महाराजांचा अवतार झाला. (१५३३-१५९९)) संतांनी नुसतेच तत्वज्ञान सांगत बसले नाही तर त्यांनी आपल्या भोवतालच्या वातावरणाचा सुद्धा अभ्यास करून अन्यावर आवाज उठवला आहे याचे उदहरण म्हणजे नाथ महाराज, तुकाराम महाराज आदिकरून सर संतांनी राजकीय अराजाकाबद्दल प्रतिकार केला. सन १५६४ मध्ये हुसेनशाहने विजयनगरच्या साम्राज्यावर हल्ला केला. कुटील चाल खेळून त्याने राज्यात भेद घडवून आणला आणि राजा रामरायचा पराभव केला. इतकेच नव्हे तर त्या हिंदू राजाचे शीर कापून ते मोरीच्या तोंडावर बसवले, जेणेकरून सर्व सांडपाणी त्याच्या तोंडातून बाहेर पडावे.
गोव्यात फिरंग्यांनी ६०० मंदिरे उधवस्त केली हिंदुना जिवंत जाळणे, गुलाम करून विकणे व अनन्वित अत्याचार सुरु केले असा सर्वत्र अराजकतेचा भयानक काळ आला. राजसत्तेबरोबरच संतांनी सुद्धा प्रतिकाराचा विचार केला व त्यासाठी त्यांनी त्यांची लेखणी वापरली. कीर्तन प्रवचन या माध्यमाद्वारे प्रबोधन केले. नाथबाबांचे अंत:करण कळवळले. त्यांना हा अन्याय सहन झाला नाही त्यांनी आर्ततेने जगदंबेला हाक मारली.
बये दार उघड, बये दार उघड, बये दार उघड॥
अलक्षपूर भवानी दार उघड।
माहूर लक्ष्मी दार उघड।
कोल्हापूर लक्ष्मी दार उघड।
तुळजा लक्ष्मी दार उघड।
तेलंगण लक्ष्मी दार उघड।
कन्नड लक्ष्मी दार उघड।
पाताळ लक्ष्मी दार उघड।
अष्टभुजा लक्ष्मी दार उघड।
बया दार उघड॥
वरील भारुडावरून आपल्याला श्री एकनाथ महाराजांचे अंत:कारण कळण्यास मदत होईल. अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली अलंदिसी येवोनी काढ वेगी हा माउलीचा आदेश मानून श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला व ज्ञानेश्वरीचे संपादन केले. संत जनार्दन स्वामीचा बालपणीच अनुग्रह घेतला १२ वर्षे त्यांच्याकडे अध्ययन केले व सेवा केली त्याचेच फळ म्हणून कि काय त्यांच्या घरी १२ वर्षे साक्षात भगवंतांनी १२ वर्षे श्रीखंड्या होऊन पाणी भरले. धन्य एकनाथ महाराज, गंगा तीरी पैठण नगरी, नाथा घरी आले गोविंद ब्रह्मयाची ब्रह्मपुरी कि प्रेमानंद .... हा कादिबंद श्री माधव मल्हारी यांनी जवळ जवळ १५ कडव्याचा लिहिला आहे. नाथ महाराजांची आपल्या गुरुवर अत्यंत निष्ठा होती म्हणूनच त्यांनी त्यांच्या प्रतेक कवणाच्या शेवटी एका जनार्दनी हि नाममुद्रा ठेवली . लोकांना नाथांचे आडनाव माहित नाही पण जनार्दनाचा एका सर्वांना माहित आहे , किंबहुन एका जनार्दनी पूर्ण कृपेनेह्व अशी नाममुद्रा लावून कोणीही कवन लिहिते.
श्री नाथांनी श्रीमद भागवतातील ११ व्या स्कंदावर १८८१० ओव्यांची सुंदर तात्विक टीका लिहिली आहे. तसेच ४०००० ओव्याचे भावार्थ रामायण लिहिले . विशेष म्हणजे त्यात त्यांनी काही कथांचे खंडनही केले आहे. उदा. श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना झाडाखाली ठेवून पाणी आणायला गेला नव्हता तर ते त्याच्या बरोबर होते. याकरिता त्यांनी शिवारामायनाचा दाखला दिला.
अस्पृशाच्या लहान मुलाला कडेवर घेवून स्वत:च्या घरी आणून त्याला त्याच्या मातेच्या स्वाधीन केले. यवन अन्गावी थुंकला े प्रसाद देवूनी मुक्त केला ेह्व या त्यांच्या कृतीतून समतेचा संदेशहि दिला गेला. हिंदुना करता अल्ला चुकला े त्याहुनी थोर तुमच्या अकला असे म्हणून त्यांनी कानउघाडणी सुद्धा केली. मोमीन, लतिफ मुसलमान, सेना न्हावी, कान्होपात्रा वेश्या, दादू हा पिंजारी, चोखामेळा महार पण ! ह्यापैकी वारकरी संप्रदायात सर्वांना स्थान होते कोणताही भेद पाळीत नव्हते याचा आणि संत एकनाथ महाराजांचा या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टीकोन समत्वाचा होता उदा. ... कां रे महारा मदमस्ता । कांहो ब्राम्हणबुवा भलतेच बोलता ?.... तुमचे आमचे मायबाप एकच हाय ह्ल असा विद्रोह सुद्धा त्यांच्या भारुदामधून बघायला मिळतो
एकनाथी अभंग गाथा संत एकनाथमहाराज कृत हरिपाठ - एकूण २५ अभंग हस्तमालक टीका शुकाष्टक टीका , स्वात्मबोध , चिरंजीवपद , आनंदलहरी , अनुभवानंद , मुद्राविलास , लघुगीता , समाजाच्या जागृतीसाठी अभंग, गवळणी व भारुडे यांची रचना. , ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतींचे शुद्धीकरण (ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर जवळजवळ २५० वर्षांनंतर) ज्ञानेश्वरी च्या शुद्धीकरणाचे काम त्यांनी शके १५०६ मध्ये पूर्ण केले. , रुक्मिणीस्वयंवर असे साहित्य त्यांनी निर्माण केले व सामाजिक स्थैर्यास फार मोठा हातभार लावला. त्यामध्ये हिंदी, मराठी , संस्कृत, प्राकृत अशा भाषेमध्ये ग्रंथ रचना केली आहे.
मराठी भाषेचा स्वाभिमान त्यांना होता म्हणून त्यांनी स्पष्ट लिहिले कि,ह्व संस्कृत वाणी देवे केली आणि प्राकृत काय चोरापासून झाली ?ेह्व त्यांच्या मराठी साहित्याने विशेष करून वारकरी संप्रदायात फार मोठी मोलाची भर पडली. वेदांताची जासी प्रस्थानत्रयी आहे तसीच वारकरी साम्प्रद्याची सुद्धा ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांचा गाथा, व नाथ महाराजांचा भागवत ( नाथ भागवत ) हि प्रस्थानत्रयी आहे . नाथांच्या हे योगदान लक्षात घेऊन लाखो वारकरी फाल्गुन व. षष्टी या तिथीला पैठणला हजारो दिंड्या घेऊन वारीला येतात व भानुदास एकनाथ हा जयघोष करीत कृतकृत्य होतात. फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२५ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत श्री एकनाथ महाराजांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखली जाते.
भागवताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिले
गुरुकुल भागावाताश्रम , चिचोंडी(पाटील) ता. नगर
ह. मु. मेलबोर्न , आॅस्ट्रेलिया
मोब. क्रमांक +६१ ४२२५६२९९१