विकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 02:41 AM2018-07-06T02:41:28+5:302018-07-06T02:41:55+5:30
माझ्या माहितीतले एक वयस्कर असे हार्ट अटॅक येऊन गेलेले गृहस्थ आहेत. ते अविवाहित असल्यामुळे, एका छोटयाश्या खोलीत एकटेच राहत असतात मात्र नेहमी आनंदीत दिसतात. मी त्यांना विचारले की तुम्ही नेहमी आनंदीत कसे काय रहाता?
- प्रा.डॉ. संदीप ताटेवार
माझ्या माहितीतले एक वयस्कर असे हार्ट अटॅक येऊन गेलेले गृहस्थ आहेत. ते अविवाहित असल्यामुळे, एका छोटयाश्या खोलीत एकटेच राहत असतात मात्र नेहमी आनंदीत दिसतात. मी त्यांना विचारले की तुम्ही नेहमी आनंदीत कसे काय रहाता? तर ते म्हणाले जीवन जगात असतांना मी असा विचार करतो की जीवनातला प्रत्येक क्षण आहे त्या परिस्थितीत आपण आनंदानी जगू शकतो किवा दु:खानी ! या दोन विकल्पांपैकी मी आनंदानी जगण्याचा विकल्प प्रत्येक वेळी स्वीकारत असतो. अमतिाभ बच्चन यांच्या ‘‘ कौन बनेगा करोडपती ’’ या दूरदर्शन मालिकेत प्रत्येक प्रश्नाला चार विकल्प दिलेले असतात. जो स्पर्धक प्रत्येक प्रश्नाला योग्य विकल्प निवडत जातो तोच शेवटी करोडपती बनतो तसेच जो संकटकाळी योग्य लाईफ लाईनचा विकल्प निवडतो तोच अचूक उत्तर देऊ शकतो. आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या जवळ विकल्प उपलब्ध असतात. कोणी आपल्याला शिवीगाळ केली तर ढोबळमानाने दोन विकल्प. एकतर आपण त्याच्या प्रमाणेच शिवीगाळ करू शकतो किंवा स्वत:ला त्रास न करता शांतपणे समजावून सांगू शकतो. जीवनात कोणतेही संकट आले तर पुन्हा ढोबळमानाने दोन विकल्प असतात . संकटाला शांतपणे स्वीकारून धैर्याने तोंड देऊ शकतो किंवा स्वत: अिस्थर होऊन भीतीने तोंड देऊ शकतो. पिहल्या विकल्पामुळे आपण परिस्थितीवर मात करू शकतो तर दुसर्या विकल्पामुळे परिस्थिती आपल्यावर मात करू शकते.
प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या जवळ विकल्प उपलब्ध असून सुद्धा बरेचदा आपण बुद्धिला उपलब्ध विकल्पावर काम करू देत नाही. आपल्या बुद्धिमध्ये कोणता विकल्प निवडायचा व कां निवडायचा याचे द्वंद चालू असते मात्र आपण उपलब्ध विकल्पावर विचार न करता आपल्या स्वभावानुसार बरेचदा निर्णय घेत असतो मग आपला स्वभाव व संस्कार चांगले तर कार्य चांगले! प्रत्येक परिस्थितीमध्ये कोणता विकल्प निवडायचा हे आपल्या ज्ञानावर, विचारांवर, संस्कारांवर व स्वभावावर अवलंबून असते. जेव्हा आपण प्रत्येक परिस्थिती मध्ये आपले मन शांत ठेवतो, विविध उपलब्ध विकल्पावर सखोल विचार करतो, योग्य विकल्प निवडतो व पूर्ण शक्तीने अंमलात आणतो. तेंव्हाच यश प्राप्त होत असते.