शिल्पकार तुम्हीच!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 04:59 AM2019-01-31T04:59:49+5:302019-01-31T05:01:15+5:30
आंतरिक पातळीवरसुद्धा जोपर्यंत तुम्ही यथायोग्य ती कृती करत नाही, तोपर्यंत तिथेही काही साध्य होणार नाही.
- सद्गुरू जग्गी वासुदेव
प्रत्येकाला आपले जीवन आणि सुख-समृद्धी महत्त्वाची असते आणि म्हणून लोक त्यांच्या स्व-कल्याणात भरपूर वेळ गुंतवतात. तुम्ही पाहिले असेल, एखाद्या व्यक्तीने इंजिनीअर बनून पैसे कमविण्यासाठी त्याच्या आयुष्याची पंचवीस वर्षे गुंतविलेली असतात. त्याचे कुटुंब उभे करण्यासाठी त्याने त्याच्या आयुष्याचा अर्धा वेळ खर्ची केलेला असतो, परंतु त्याने किती वेळ स्वत:च्या आंतरिक-कल्याणासाठी दिला आहे? आज लोक त्यांच्या सभोवतालची स्थिती हाताळण्यात आणि दुरुस्त करण्यात व्यस्त आहेत, परंतु परिस्थितीत कितीही सुधारणा केली, तरी तुम्ही त्यांना शंभर टक्के दुरु स्त करू शकणार नाहीत. अगदी कोणीही हे करू शकणार नाही. जगभरात असलेले समृद्ध समाज, ही याची जिवंत उदाहरणे आहेत. त्यांनी बाहेरील परिस्थितीवर उत्तम प्रकारे नियंत्रण मिळविले, पण जरा लोकांची अवस्था पहा. उदाहरणार्थ, युरोपीयन देशांनी, बाह्य परिस्थिती सुयोग्य पद्धतीने बसवल्या आहेत, पण त्यांच्या एकूण लोकसंख्येपैकी अंदाजे ४0 टक्के लोक मानसिक विकारांनी ग्रस्त झालेले आढळतात. दैनंदिन व्यवहारात सामान्य माणसासारखे वागण्यासाठीसुद्धा त्यांना दररोज औषधे घ्यावी लागतात! हे काही कल्याण नव्हे.
आंतरिक पातळीवरसुद्धा जोपर्यंत तुम्ही यथायोग्य ती कृती करत नाही, तोपर्यंत तिथेही काही साध्य होणार नाही. जसे बाह्यकल्याणाची निर्मिती करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, तसेच आंतरिक कल्याण साधण्यासाठीसुद्धा एक परिपूर्ण विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, ज्याला आपण योग विज्ञान म्हणतो, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या नियतीचे शिल्पकार बनू शकता.