खळांची व्यंकटी सांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 01:58 AM2019-03-25T01:58:08+5:302019-03-25T01:58:39+5:30

जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, जिकडे-तिकडे खळांचा सुळसुळाट होतो, सज्जन माणसाचे जगणे मुश्कील होते तेव्हा तेव्हा भगवंत कुठल्यानं कुठल्या रूपात अवतार घेतो.

 Ponytail | खळांची व्यंकटी सांडा

खळांची व्यंकटी सांडा

Next

- प्रा. शिवाजीराव भुकेले

जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, जिकडे-तिकडे खळांचा सुळसुळाट होतो, सज्जन माणसाचे जगणे मुश्कील होते तेव्हा तेव्हा भगवंत कुठल्यानं कुठल्या रूपात अवतार घेतो. आपल्या अलौकिक लीलेने तो दैत्य, दुर्जन व खळाच्या कुळांचा नाश करून संतांच्या जीवनात सुखाची गुढी उभी करतो, असे प्रसिद्ध गीता वचन आहे. या वचनात भगवंत पुन्हा पुन्हा म्हणतात -
‘‘यदा-यदा ही धर्मस्य ग्लानीर्भवती भारत:
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं् सृजाम्यहं’’
धर्माचे अभ्युत्थान करण्यासाठी भगवंत अवतार घेतो हे वचन पारमार्थिक सत्य म्हणून मान्य करण्यासारखे आहे; परंतु एक प्रश्न पुन्हा पुन्हा डोक्यात घोंगावत राहतो. धर्मावर अधर्माची काजळी आणणाऱ्या वाकड्या वृत्तीच्या खळांची शरीरे नष्ट झाली किंवा शस्त्राने प्रहार करून नष्ट केली तर सत्त्वशील समाजाची निर्मिती होऊ शकेल का? खरं तर खळ गारवेलीसारखे असतात. जे समाजरूपी सात्त्विक जलाला वेढून टाकतात व आपण नष्ट होताना आपले वारसदारही निर्माण करून जातात. ज्ञानदेवासारख्या संवेदनशील माउलीला खळाच्या एक-एका दुर्गुणाची नोंद घेऊन त्यांची शरीरे नष्ट करणारी हिंसक कल्पना मानवली नाही. म्हणून महाराष्ट्राच्या या माय माउलीने खळांच्या मर्मस्थळांवर प्रहार न करता आपल्या हृदयातील सगळा चांगुलपणा खळांच्या वृत्तीवर समर्पित करताना म्हटले होते
जें खळांची व्यकंटी साडों। तया सत्कर्मी रती वाढों
भुता परस्परे जडों। मैत्र जीवांचे।।
खळांचा खळपणा जर नष्ट व्हायचा असेल तर त्यांच्या शरीरावर प्रहार करू नका. त्याऐवजी त्याच्या वृत्तीतील वाकडेपणा नाहीसा झाला पाहिजे.

Web Title:  Ponytail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.