व्यवहारात, बोलण्यात धर्म हवा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:14 PM2019-09-23T12:14:26+5:302019-09-23T12:15:33+5:30

आध्यात्मिक...

In practice, speaking requires religion ...! | व्यवहारात, बोलण्यात धर्म हवा...!

व्यवहारात, बोलण्यात धर्म हवा...!

Next

 ‘आपण कोणीतरी मोठे आहोत, हा अहंकार बाजूला ठेवावा लागेल. आपले तथाकथित शहाणपण विसरावे लागेल. आपण अगदीच सामान्य आहोत, हे लक्षात घ्यावे लागेल. अशा नम्र माणसाला भगवंत जवळ करतो. मीपणा माणसाला हरवितो’.

अनेकदा माणसाला आपल्या ज्ञानाचा, आपल्या विद्वत्तेचा, आपल्या अभ्यासाचा एवढा अहंकार होतो की तो स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजतो आणि इतरांना तुच्छ लेखतो. समाजात, परिवारात, चारचौघांत वावरताना हा अभिमान माणसाला नडतो.

भक्तांनो या विश्वात फक्त एकच वस्तू सत्य आहे आणि ती शाश्वत सत्य वस्तू म्हणजे संत, भगवंत, प्रवचन, कीर्तन, संतवचने हेच होय. त्या सत्याला सामोरे जाण्यासाठी फार मोठी साधना करावी लागते. यासाठी संतांच्या, गुरूंच्या, भगवंताच्या चरणी बसून ते जे काही सांगतील, त्यांचा उपदेश लक्षपूर्वक ऐका आणि आपल्या जीवनात तशी कृती ठेवा. आपल्या व्यवहारात, बोलण्यात धर्म हवा.

आपल्यापाशी दृष्टी आहे याचा अनेकांना अभिमान वाटतो. फार थोडे भक्त असे असतात की जे ही लाभलेली दृष्टी म्हणजे भगवंताची आपल्यावर परमकृपा झालेली आहे. या कृतज्ञ भावनेने जगतात आणि ज्या भगवंताने ही दृष्टी दिली त्याचा शोध घेण्याचा ते प्रयत्न करतात. संतांना स्वत:चे वैयक्तिक असे आयुष्य नसतेच. 

लोकांच्या कल्याणासाठी ते आपले आयुष्य पणाला लावतात. सभोवतालच्या लोकांची दु:खे कमी होईल म्हणून ते सदैव झटत असतात. यासाठी संतांच्या चरणी बसा. संत आपल्याला वारंवार एकच गोष्ट सांगतात की सतत ईश्वराचे नामस्मरण करा. जीवन धर्ममय बनवा.
- गौतममुनीजी

Web Title: In practice, speaking requires religion ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.