राजयोग :स्वस्थ व सुखी जीवनाचा आधार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 06:22 PM2019-06-25T18:22:20+5:302019-06-25T18:23:21+5:30
राजयोगाचा अर्थच आहे, आत्म्याचा एक सर्वश्रेष्ठ ज्योती पिता परमात्मा बरोबर संबंध.
आज प्रत्येक व्यक्तिशी इच्छा असते की जीवनात सुख, शांती, समाधान, स्वास्थ्य असावे. परंतु आजच्या भौतिक जगात मनुष्य भौतिक साधन प्राप्त करण्याच्या मागे धावत आहे. भौतिक सुखाचा शोध घेत आहे. परंतु जेवढे भौतिक साधन, सुख, सुविधा उपलब्ध होत आहेत. तेवढा सुख शांती मनुष्यापासून दूर होत आहे व तो दु:खी होत चाललेला आहे. आपल्या वास्तविकतेपासून दूर होत आहे.
मनुष्य अत्यंत बुध्दीवान प्राणी आहे. मनुष्याजवळ विवेकशक्ती आहे. सुदंर मन आहे, सुंदर विचार आहेत. परंतु मानवी मुल्यांचा ºहास व नकारात्मकता वाढल्याने मनुष्याच्या जीवनात दु:ख, परेशानी, तणाव याच्यात वाढ होत चालली आहे. सुख शांती प्राप्त करण्यासाठी मनुष्याच्या जीवनात राजयोगाची नितांत आवश्यकता आहे. भारताच्या प्राचीन संस्कृतीतही योगाचे महत्वपूर्ण स्थान आहे. भारत सुरूवातीपासूनच संपुर्ण विश्वाला योग व आध्यात्मिकतेचे शिक्षण देत आहे. स्वामी विवेकानंदांनीही १८९३ मध्ये शिकागो धर्म संमेलनामध्ये आपल्या वक्तव्याव्दारे संपुर्ण जगासमोर भारताला योग गुरूच्या रूपात प्रसिध्द केले.
भारताचा प्राचीन सर्वश्रेष्ठ योग, राजयोग आज जगामध्ये अनेक प्रकारचे योग, जप, तप, आसन ध्यान, प्राणायाम, हठयोग मुद्रा इत्यादी प्रसिध्द आहेत. ज्याव्दारे आपले शरीर स्वस्थ व निरोगी होण्यास मदत होते. परंतु ब्रम्हकुमारी संस्थेमध्ये मागील ७८ वर्षापासून पूर्ण विश्वात पसरलेल्या ९००० सेवा केंद्राच्या माध्यमातून शिव परमात्माने दिलेल्या ज्ञान व राजयोगाचे शिक्षण दिले जाते. ज्याव्दारे लाखो लोकांनी आपल्या जीवनात सुख-शांती प्राप्त केली.
राजयोगाचा विधी
राजयोग म्हणजे प्रार्थना, मंत्र जपने व विचार शून्य अवस्था नाही. राजयोगाचा एक विधी आहे. राजयोगाचा अर्थच आहे, आत्म्याचा एक सर्वश्रेष्ठ ज्योती पिता परमात्मा बरोबर संबंध.
ज्याप्रमाणे चांदणीचे चकोर बरोबर, मिराचे श्रीकृष्ण बरोबर दिव्य प्रेम आहे. त्याचप्रमाणे परमात्म्याच्या आत्म्याशी दिव्य प्रेमपूर्ण आठवण व संबंधातच राजयोग म्हणतात. परंतु त्यासाठी आत्मा व परमात्माचे यतार्थ ज्ञान असावयास हवे, हे ब्रम्हाकुमारी संस्थेत दिले जाते.
ईश्वराची आठवण सहज येण्यासाठी चार आधार आहेत. कारण आज बहूतेक लोक ही तक्रार करतात की, मन परमात्म्यामध्ये लागत नाही. पहिला आधार ओळख - जेथे ओळख असते तेथे आठवण येते. स्वत:ची ओळख - मी एक आत्मा आणि सुक्ष्म ज्योती, दोन्ही भुवयांच्यामध्ये चमकणारा अजर-अमर, अविनाशी सितारा, शरीर विनाशी पंचतत्वाचा पुतळा, शरीराला चालविणारी शक्ती आत्मा, आत्मा ज्याची आठवण करावयाची, योग्य लावायचा तो परमात्मा शिव सर्व आत्म्याचा पिता, ज्याला सर्व देवांनी पुजले. सर्व धर्मात ज्याची मान्यता आहे. जो सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यांचे रूप आत्म्याप्रमाणे ज्योती आहेत. पण ते गुणाचे सिंधू आहे. सर्व शक्तीवान आहेत. दुसरा आधार संबंध जेथे संबंध तेथे आठवण परमात्म्याशी मुख्य रूपात ६ संबंध जोडू शकतो. १) टिचर-स्टूडंट, २) गुरू व शिष्य, ३) दोस्त, ४) साजन-सजनी, ५) पती-पत्नी, ६) ईश्वराला आपला मुलगा समजा, भक्ती मार्गात आपण म्हणतो, तुम्ही हो माता, पिता, बंधु, सखा, स्वामी पण राजयोगाच्या आधारावर प्रॅक्टीकल त्या संबंधाची अनुभूती करू शकतो.
तिसरा आधार स्नेह, पे्रम - जेथे प्रेम तेथे स्वाभाविकच आठवण येते. परमात्म्याशी जवळचा संबंध जोडला की प्रेम उत्पन्न होते. तेव्हा आठवण करण्याची गरज नाही. स्वाभाविक आठवण येते.
चौथा आधार प्राप्ती - कोणाकडून काही फायदा आहे. काही मिळणार असेल तर आठवण येते. स्वार्थाच्या आधारावर आठवण, परिचय आधारावर आठवण करण्यास मेहनत लागते. आठवण करावी लागते संबंधाच्या आधारावर आठवण सतावते. स्नेहाच्या आधारावर आठवण समावून जाते तल्लीन होते. प्राप्तीच्या आधारावर आठवण - स्वार्थी आठवण. परमात्म्याशी आपली आठवण सामावून जाणारी असावी. त्या आठवणीतून सुख मिळेल. संबंध जर पक्का असेल त्याच्याविषयी प्रेम आपोआप निर्माण होईल तेथे आठवण आपोआप येईल.
भक्त प्रल्हादाने माता-पित्याच्या रूपात आठवण केली तर ईश्वर माता-पिता बनले. अर्जुनाने दोस्ताच्या रूपात आठवण केली तर ईश्वर दोस्त बनले. संत मिराबाईने प्रियतमाच्या रूपात आठवण केली तर प्रियतम बनले. सती अनुसयाने मुलाच्या स्वरूपात आठवण केली तर मुलगा बनले. ईश्वर जगात अशी शक्ती आहे की आपण जो संबंध जोडू तो संबंध ते प्रामाणिक निभावतात. अशा प्रकारे आपण सहज राजयोग शिकुन आपले प्रॅक्टीकल योगी जीवन बनवू शकतो.
राजयोगाचे फायदे
राजयोग खºया अर्थाने जीवन जगण्याची कला शिकवतो, राजयोगाव्दारे प्रत्येक कर्मात, सफलता येते, एकाग्रता वाढते, मनोबल वाढते, विचारात दृढता येते, तणाव दूर होवून निश्चीत आनंदी जीवन बनते, विकारावर विजय प्राप्त करून दिव्य गुणांची धारणा होते, विचारात शुध्दता येते, दृष्टीकोन सकारात्मक व शुध्द बनतो.
- बी.के.शकुंतला दिदी,
ब्रम्हाकुमारीज् सेवा केंद्र,
खामगाव.जि.बुलडाणा