मूर्तिपूजा करण्यामागची कारणे...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 06:15 AM2019-11-26T06:15:10+5:302019-11-26T06:15:25+5:30

अमूर्त म्हणजे अमर्याद, मूर्त म्हणजे सीमित. मूर्त मापाने मोजता येतं. अमूर्त अगणित अनंंत असतं. याचाच खुलासा श्रीचक्रधर या सूत्रातून करतात.

Reasons for idolatry ... | मूर्तिपूजा करण्यामागची कारणे...

मूर्तिपूजा करण्यामागची कारणे...

googlenewsNext

- बा.भो. शास्त्री

अमूर्त म्हणजे अमर्याद, मूर्त म्हणजे सीमित. मूर्त मापाने मोजता येतं. अमूर्त अगणित अनंंत असतं. याचाच खुलासा श्रीचक्रधर या सूत्रातून करतात. ‘‘मूर्ती परमेश्वर एक घेऊनी एक देती अमूर्ती काहीच न घेती’’ आपण व्यवहारात जे दिसतं त्यासोबत असतो. अदृष्टाबरोबर नसतो. न दिसणाऱ्या रोग-जंतूंना प्रथम यंत्राच्या मदतीने व्यक्त करतो; नंतर त्यावर उपचार करतो. जे दिसतच नाही तिथं डॉक्टरही हात टेकतो. त्यासाठी आपल्याला व्यक्त स्वरूप लागतं. सर्वज्ञ पण निराकार परमेश्वरापेक्षा साकार ईश्वराची जास्त गरज असल्याचं सांगतात. प्रत्येक वस्तूची स्थूल व सूक्ष्म अशी दोन रूपं असतात. तशीच परमेश्वराचीही साकार व निराकार अशी दोन रूपं आहेत. ते दोन असूनही एकच असतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
‘‘तुज सगुण म्हणू की निर्गुण रे
सगुण निर्गुण एक गोविंदू रे’’

पाहाना! भूमी ही सर्व धान्यांंची आई आहे. हे सत्य; पण धान्य जवळचं वाटतं. ती गंधवती रसवती असली तरी तो गंध व रस आपल्याला दिसत नाही आणि आपल्या डोळ्यांचा विषय होत नाही. गुणाच्या अव्यक्त मनात काय चाललंय कुठे कळतं आपल्याला? अव्यक्त व्यक्त व्हायला हवं. काही वस्तू दिसत असतात; पण पेलत नसतात. सूर्याचं मोठेपण मान्य करूनही तो आम्हाला कुठे पेलतो, त्याचे किरण भावतात. ते जवळचे वाटतात. ते आपलं पोषण करतात, दृष्टी देतात.

‘‘वसुदेवं परित्यज्य वासुदेवंं उपासते’’
वसुदेवाची जगात मूर्ती नाही कृष्णमूर्तीची जगभरात असंख्य मंंदिरे आहेत. आम्ही त्याच्या कृतीने प्रभावित झालो. अव्यक्त परमेश्वर अमूर्त व सर्वव्यापक आहे. पण त्याचं साकार स्वरूप आम्हाला जवळचं वाटतं. त्याचं खाणंपिणं, उठणंबसणं, आकार आपल्यासारखाच असतो. जिथं साम्यता असते तिथं परकेपणा सहसा राहत नाही. निराकारात मनन-चिंतन असतं. कृती नसते.

Web Title: Reasons for idolatry ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.