नाते अर्धांगिनीचे; त्याग आणि समर्पणाचे..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 09:46 PM2019-12-21T21:46:53+5:302019-12-21T21:48:03+5:30

ती घराची शोभा असते तिचा आदर करा..

The relationship of wife is dedication and Sacrifice | नाते अर्धांगिनीचे; त्याग आणि समर्पणाचे..

नाते अर्धांगिनीचे; त्याग आणि समर्पणाचे..

Next

एक रामलाल नावाचा घरगडी होता. तो आपल्या बायकोला खूप घाबरत असे. दिसायला हट्टा कट्टा होता पण तरी देखील बायकोला घाबरत असे. एक दिवस मालकाने त्याला विचारले रामलाल, तू बायकोला एवढा का घाबरतोस.? त्यावर त्याने उत्तर दिले, साहेब मी घाबरत नाही तर तिची कदर करतो, तिचा सन्मान करतो. त्याचे हे बोलणे ऐकून मालक हसून म्हणाले, तिच्यामध्ये असे काय आहे, ना ती सुंदर आहे, ना ती सुशिक्षित आहे.रामलाल म्हणाला, काही फरक पडत नाही..साहेब ती कशी आहे, पण मला सगळ्यात प्रेमाचे नाते तिचेच वाटते. त्याचे बोलणे ऐकून मालक म्हणाला. बायकोचा बैल आहेस, तिच्या पदराला बांधून घेतले आहे. स्वत:ला आणि इतर सगळ्या नात्यांची किंमत नाही तुला.......

रामलालने सगळे शांतपणे ऐकून घेतले आणि उत्तर दिले. साहेब आई-वडील नातेवाईक नसतात, ते देव असतात. त्याच्यासोबत नाते नसते निभवायचे, त्यांची पूजा करायची असते. भाऊ-बहिणी सोबत नाते हे जन्मजात असते. मैत्रीचे नाते हे स्वार्थाचे.. आपलेच नाते पहा फक्त पैसे आणि गरजेचे आहे, पण पत्नी कोणतेही नाते नसताना देखील कायमची आपली होऊन जाते. आपले सगळे नाते सोडून ती आपल्यासोबत येते आणि आपले सगळे सुखदुख एकत्र जगते आणि शेवटच्या श्वासापर्यत सोबत करते. एका नोकराचे आपल्या पत्नी बद्दल काय विचार आहेत हे मालक ऐकत होते. तो पुढे म्हणाला साहेब, पत्नी म्हणजे केवळ एक नाते नाही तर अनेक नात्यांचा भांडार आहे. जेव्हा ती आपली सेवा करते, आपल्यावर प्रेम करते तेव्हा ती एका आई प्रमाणे करते. जेव्हा ती जीवनातील उतार चढावा बद्दल सूचित करते आणि मी आपली सगळी कमाई तिच्या हातात देतो कारण मला माहित आहे कि, ती आपल्या घराचे हित साधेल तेव्हा ती एका पित्या सारखी असते. तो पुढे म्हणाला, जेव्हा ती आपली काळजी घेते आपले लाड करते, आपल्या चुकांवर रागावते आपल्यासाठी खरेदी करते तेव्हा ती आपल्या बहिणी प्रमाणे होते. जेव्हा ती आपल्याकडे नवनवीन फरमाइश करते, नखरे करते, रुसते, हट्ट करते तेव्हा ती मुली सारखी होते. जेव्हा ती आपल्या सोबत सल्लामसलत करते, कुटुंब चालवण्यासाठी सल्ले देते, भांडण करते तेव्हा एका मित्रा सारखी होते. जेव्हा घरातील सगळे देणेघेणे, खरेदी, घर चालवण्याची जिम्मेदारी उचलते तेव्हा ती एक मालकीण होते. तो पुढे म्हणाला आणि जेव्हा ती सगळ्या जगाला विसरून एवढेच नाही आपल्या मुलांना देखील सोडून आपल्या मिठीत येते तेव्हा ती प्रेमिका, अर्धांगिनी, आपला प्राण आणि आत्मा होते. जी आपले सर्वस्व आपल्या स्वाधीन करते. मी तिचा सन्मान करतो तर हे काही चूक करतो का साहेब? मालक सगळे बोलणे ऐकत होता. हे सगळे ऐकून तो स्तब्ध झाला. एका निरक्षर आणि गरिबीमध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्तीकडून आज जीवनाचा नवीन विचार मिळाला होता. मित्रांनो, नवरा बायकोचे नाते हे खुप महत्वाचे असते .
ते मनापासून जपा . दोघांनीही एकमेकांचा आदर करा . व आनंदी रहा .पत्नी ही आपल्या घरासाठी पूर्णत: झोकून देते . त्याग व समर्पण हे निसर्गत: तिच्या स्वभावात असते. ती घराची शोभा असते तिचा आदर करा .
 

Web Title: The relationship of wife is dedication and Sacrifice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.