धर्मामुळेच जीवनाला दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 05:03 PM2019-08-11T17:03:20+5:302019-08-11T17:03:25+5:30
आयुष्यात एखादा जवळचा मित्र असलाच पाहिजे. जो तुम्हाला योग्य दिशा दाखवील. धर्म हा प्रत्येकाचा जवळचा मित्र असतो
आयुष्यात एखादा जवळचा मित्र असलाच पाहिजे. जो तुम्हाला योग्य दिशा दाखवील. धर्म हा प्रत्येकाचा जवळचा मित्र असतो. धमार्मुळेच जीवन बदलते. मित्र कसा असावा तर संकटात मदत करणारा. योग्य मार्गावर नेणारा हवा. मित्र सच्चा हवा. संकटात जो सोडून जात नाही तोच खरा मित्र.
जीवाला जीव देणारा मित्र दुसऱ्याला बरबादीपासून वाचवितो. आयुष्य बदलून देण्यासाठी प्रयत्न करणाराच खरा मित्र होय. वाईट संगतीचा परिणाम वाईटच होतो म्हणून वाईट संगतीच्या, विचारांच्या माणसापासून, मित्रांपासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी. घरातील संस्कार नामशेष होणार नाहीत. मोबाईलचा अतिवापर करण्यापासून जो दूर राहिल अशा माणसांशीच मैत्री करावी. तोच मित्र परस्परात चांगले वातावरण निर्माण करतो. मित्र समजदार हवा. मोठ्यांचा आदर मित्रांकडून व्हायला हवा. ज्याला पैशाची किंमत कळते, पैशाची बचत कशी करावी हे कळणारा, अध्यात्माची गोडी असणाºया व्यक्तीबरोबरच मैत्री करावी. मित्राने चांगल्या कामांना प्रोत्साहन दिले पाहिजे. धर्म हा प्रत्येकाचा महत्वाचा मित्र असून तोच आपल्याला चुकीच्या मार्गापासून दूर नेतो. धर्मामुळे माणसाचे आयुष्य पालटते. जीवनात पहिला दोस्त शरीर, दुसरा दोस्त परिवार जन आणि तिसरा महत्वाचा दोस्त धर्म असतो. धर्माला जवळ करा. धर्मानुसार वागा, खूप मित्र मिळतील.
- पू.श्री.सन्मतीजी महाराज.