संत

By admin | Published: September 10, 2016 12:35 PM2016-09-10T12:35:00+5:302016-09-10T12:46:14+5:30

सध्या संत ही संज्ञा अत्यंत गुळगुळीत झाली आहे आणि कुठल्याही योग्यतेचा विचार न करता कोणालाही संत म्हटले जो. ‘‘बहु अवघड आहे. संत भेटी। परी जगजेठी करुणा केली ।।’’ एकूणच ईश्वर कृपेशिवाय संत भेट होणे नाही.

Saint | संत

संत

Next

बाळासाहेब गरुड, ठाकूरबुवा

सध्या संत ही संज्ञा अत्यंत गुळगुळीत झाली आहे आणि कुठल्याही योग्यतेचा विचार न करता कोणालाही संत म्हटले जो. ‘‘बहु अवघड आहे. संत भेटी। परी जगजेठी करुणा केली ।।’’ एकूणच ईश्वर कृपेशिवाय संत भेट होणे नाही. परमार्थामध्ये संत भेटीला प्रथम क्रमांकाचे मूल्य आहे. म्हणूनच सर्व संत संतांचे वर्णन करुन संतांची ओळख करुन देण्याचा प्रयत्न करतात. ‘‘तेचि संत तेचि संत । ज्यांचा हेत विठ्ठले ।। नेणति काही टाणा टोणा नामस्मरणावाचूनि ।।’’ निळोबाराय ज्यांना प्रत्यक्ष संत तुकोबारायाचे सान्निध्य लाभले ते संताबद्दल बोलताना म्हणतात संत तेच ज्यांचे जीवन ध्येय विठ्ठल प्राप्तीचे आहे, ते कधीही जादू - टोणा, धूप अंगारा, गंडा - दोरा, छां - छूं असे उपचार कोणालाही सुचवित नाहीत. एक तर तुमच्या ऐहिक आणि शारीरिक व्याधीसाठी त्यांच्या जवळ उपायच नसतो. त्यांची एकच तळमळ असते. ती म्हणजे जीवाचा आत्मोध्दार व्हावा. कुठलीही समस्या घेऊन त्यांच्याकडे गेले तर ते एकच उपाय सूचवितात तो म्हणजे ईश्वराच्या नामस्मरणाचा. याचा अर्थ तू निष्काम भूमिकेवर ईश्वराशी नामस्मरणाद्वारे अनुसंधान साध तो तुला नक्कीच मदत करील. संत देहाच्या बाबतीत बिरक्त असतात. आणि त्यांना विषयाची आवड नसते. ‘‘नव्हती संत माळा मुद्रांच्या भूषणे । भस्म उधळणे नव्हती संत ।। तुका म्हणे नाही निरसला देह । तोंवरी आघवे संसारिक ।।’’ यावरुन संत तेच ठरतात जे आत्मानुभूतिवर आरुढ आहेत. ‘‘ज्ञानदेवा प्रमाण आत्माहा निधान् सर्वांघटी पूर्ण एक नांदे ।।’’ ज्यांची दृष्टी जात, धर्म, देश, राष्ट्र याच्या पलिकडे जाते, जे सर्व सृष्टीशी एकरुप झालेले असतात, ‘‘हे विश्वाची माझे घर’’ असा व्यापक विचार ज्यांचा अंगभूत असतो. ‘‘किंबहुना चराचर आपणचि जाला ।।’’ जे जे भेटे ते वाटे मी ऐसे ।। या स्थितीवर स्थिर असलेलेच संत म्हटले जातात. ज्यांना राष्ट्रभाव सुध्दा संकुचित वाटतो, ज्यांच्या डोळ्यासमोर आत्मरुपाने ईश्वराचे व्यापकत्व उभे असते, जे फक्त सत्यालाच ओळखतात व भजनानंदी आहेत तेच संत म्हणविले जातात.

Web Title: Saint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.