अहंकाराला तिलांजली देणे आवश्‍यक...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 09:37 PM2019-09-28T21:37:08+5:302019-09-28T21:37:15+5:30

"व्यक्ती तितक्‍या प्रवृत्ती, त्यांना एकत्र बांधून ठेवणे हे नेत्याचे कौशल्य असते...

The same tendency as a person…. | अहंकाराला तिलांजली देणे आवश्‍यक...

अहंकाराला तिलांजली देणे आवश्‍यक...

googlenewsNext

- डॉ.दत्ता कोहिनकर
एकमेकांना समजून घेणारा, एकमेकांवर प्रेम करणारा, एकमेकांना पडत्या काळात साथ देणारा, एकमेकांचे हित चितणारा, एकमेकांची प्रगती करणारा, एकमेकांचा आदर करणारा असा संघ नेहमी पुढे जातो.ह्यह्य म्हणून संघभावना टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या अहंकाराला तिलांजली देणे आवश्‍यक आहे. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, की सुशिक्षित लोकांना एकत्र आणणे म्हणजे बेडकांचे तराजूत वजन करण्यासारखे आहे. एक तराजूत टाकताना दुसरा झटकन उडी मारून बाहेर पडतो म्हणून संघ तयार करून सर्वांनी एकविचारांनी एकत्र राहणे आवश्‍यक असते. यासाठी नेता हादेखील निःस्वार्थ व लोकप्रिय असावा लागतो. नेपोलियनचे सैनिक त्याने दिलेला आदेश तंतोतंत पाळायचे. त्यावर कोणीही प्रतिप्रश्‍न करीत नसत किंवा शंका घेत नसत. नेपोलियनचे यश यातच दडलेले होते. एकता व आज्ञाधारकता एकत्र आली आणि संघभावना वाढीस लागली, की यशाची दारे उघडणे सोपे जाते.
 जोपर्यंत आपण संघटित आहोत, तोपर्यंत आपली किंमत उच्चतम असते. ज्या क्षणी आपण संघातून विलग होऊन एकटे होतो, तेव्हा आपली किंमत खूप खाली येते* म्हणून कुटुंबात - नातेवाइकांत, संघात राहण्यासाठी आपली धडपड चालू असते. एकटा माणूस फार मोठे काम करू शकत नाही. त्यासाठी संघाचीच गरज असते.  
पानिपतच्या युद्धात अहमदशाह अब्दाली रणनीतीची आखणी करत असताना नदीच्या पलीकडच्या काठावरील मराठ्यांच्या छावणीची पाहणी करत होता. त्या वेळी मराठ्यांच्या छावणीत जागोजागी चुली पेटलेल्या त्याला दिसल्या. मराठ्यांचे सैन्य नेमके किती याची विचारणा त्याने गुप्तहेराकडे केली, तेव्हा त्याने सांगितले, ""मराठ्यांचं सैन्य फारसं नाही. तेथील प्रत्येक सैनिकाने आपल्या स्वयंपाकासाठी स्वतंत्र चूल पेटवली आहे.ह्यह्य त्यावर चुटकी वाजवून अब्दाली म्हणाला, ""आपण शंभर टक्के युद्ध जिंकणार. कारण जे सैनिक अन्न शिजवतानाही एकत्र येत नाहीत, ते राष्ट्रासाठी एकदिलाने कसे लढतील? पानिपतचा, इतिहास आपणास माहीतच आहे म्हणून संघाने एकत्र येणे ही आवश्‍यक गोष्ट आहे. संघात लोक वेगवेगळ्या विचारांचे असतात. म्हणतात ना, "व्यक्ती तितक्‍या प्रवृत्ती, त्यांना एकत्र बांधून ठेवणे हे नेत्याचे कौशल्य असते. 
 

Web Title: The same tendency as a person….

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.