संकल्पाचा दाता नारायण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:33 PM2019-06-16T13:33:21+5:302019-06-16T13:33:25+5:30

आपण आपल्या आवडत्या माणसाला काम सांगतो. त्याला आवड नसेल तर आपण आवड निर्माण करतो. ज्ञानाला काहीतरी हेतू असावा.

Sankalpa's Data Narayan | संकल्पाचा दाता नारायण

संकल्पाचा दाता नारायण

Next

अहमदनगर :  आपण आपल्या आवडत्या माणसाला काम सांगतो. त्याला आवड नसेल तर आपण आवड निर्माण करतो. ज्ञानाला काहीतरी हेतू असावा. विज्ञानात रोज नवनवे शोध लागू लागले. त्यामुळे वैज्ञानिकांची पंचाईत होऊ लागली. विज्ञानात सुद्धा प्रत्येक क्षेत्रात अनेक सिद्धांत आले. आपल्याकडेही ईश्वर या सिद्धांताला धक्के बसले. कुठलीही गोष्ट एका शास्त्रापुरती मर्यादित राहत नाही. त्याचे सर्वत्र परिणाम होतात व मानवी जीवनावरही परिणाम होतात. देव हा विषय फार दूर निघून गेला आणि देवाशिवाय तर परमार्थ शक्यच नाही.
वैद्यकीय क्षेत्रात अनेक बदल होतात. दररोज होतात. नवीन संशोधनामुळे गोंधळ वाढला. आता तर माणसांचे काम यंत्रे करु लागले आहेत. काही वर्षांपूर्वी डॉक्टर हे देव मानले जात असत. निसर्गाची काही वैशिष्ट्ये आहेत. वणव्याची आग लागली तर वाईट झाड जळते तसे चंदनाचे झाडही जळते. परमार्थात श्रद्धेने शिकविण्याचा काळ राहिला नाही तर तर्काने शिकवावे लागेल. तुम्ही ज्या जगात जगत आहात तिथे परमार्थ करता आला पाहिजे. कृष्णाने कालिया डोहातील विष नष्ट केले व विष निर्माण होण्याची प्रक्रिया थांबविली. डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी मानवी जीवनाची दुर्दशा पाहिली गेली नाही आणि म्हणून त्यांनी परमार्थाच्या अग्निकुंडात उडी घेतली. जगात कधीही युद्ध पेटू शकेल अशा परिस्थितीत आपण जगत आहोत.
एक कवी म्हणतो की ईश्वराने उत्सव साजरा करण्याचे ठरविले आणि देवाने मला जन्माला घातले. पाडगावकरांनी लिहिले आहे ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ कवींवर असे लिहिण्याची वेळ यावी? डॉक्टर आॅपरेशन करण्यापूर्वी सही घेतात. कारण रुग्णाचा जीव वाचेल याची डॉक्टरांना खात्री देता येत नाही. अनेक शोध लागले असतांना अशी खात्री का देता येऊ नये? एखादा डॉक्टर स्पेशालिस्ट असतो पण तो सर्व आजारांवर औषध देऊ शकत नाही. अनेक वैद्यकीय तपासण्या तर यंत्रे करु लागले आहेत. परमार्थ हा विषय एकट्यासाठी नाही तर जगासाठी आहे. आज गल्लीबोळात डॉक्टर आलेत पण आरोग्याचा प्रश्न सुटला नाही. शिष्यांना शहाणे करण्याचे काम पूर्णवादाने अंगी घेतले आहे. जगाला जगायला शिकऊ शकतो हे सामर्थ्य उपासनेमुळे प्राप्त होते. विद्यार्थी तोच आहे जो रोज अभ्यास करतो. गुरुशिष्य, सर्वग्रंथ वेगळे नाहीत तर एकमेकांशी जोडल्या गेलेले आहेत. अभेद असतांना भेद का वाटतो?
तकार्ने भागात असेल तर अकारण पुरणातले दाखले कशाला द्यायचे? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात 'अर्थ शब्दाची वाट पाहे' श्रीमंत माणसांजवळ अनेक गुण असतात. अशाश्वतेमुळे आपल्याला शाश्वततेची ओढ आहे आणि यालाच परमार्थ म्हणतात. सून चांगले वागवेल का? अशी शंका असेल तर तिला घरची लक्ष्मी समजा की शाश्वतता येते. 'मी'ची जाणीव झाली. पुढे काय? नंतर अभिलाषा वाढते. पद जाऊ नये, मरण येऊ नये इत्यादी. वाटण्यामुळेच तर संघर्ष आहे. वाटले नसते तर संघर्ष निर्माण झाला असता का? लग्न करावेसे वाटते आणि पुढे काय होते ते आपणास माहित आहे. प्रत्येक क्षणाचे बारसे करायचे म्हणजे जीवनाभिनिवेश वाढता असला पाहिजे. अहंकार वाढला की जीवनाभिनिवेश वाढत नाही. जीवनाभिनिवेश ही एक प्रक्रिया आहे आणि यातून पुढे परमार्थ कळतो. संकल्प केल्याशिवाय तप शीण घडविते. अहंकार जितका कमी तितका जीवनाभिनिवेश जास्त असतो. सत्य भगवान संकल्पाचा दाता आहे. कर्माशिवाय ज्याला फलश्रुती नाही असा संकल्प. काळ बदलत नाही. काळाची विभागणी मानवाने केली आहे. परमार्थ त्याला म्हणावे जो ईश्वर सिद्ध करतो. तकार्ने सिद्ध करतो तो शास्त्रज्ञ! आम्ही अनेक वर्षे उपासना करीत आहोत. म्हणजे आमची सत्यसंकल्पाकडे वाटचाल सुरु आहे. माझा देव करेलच अशी आपल्याला परमेश्वराबाबत खात्री असावी. सर्वांनीच परमार्थी असले पाहिजे असे कुठे आहे? म्हणून (रामचंद्र) महाराज म्हणतात 'सदा शास्त्रवृत्ती...' प्रतिबोध म्हणजे गुरूकडून सारखं सारखं ऐकून घ्यावे. ग्रंथाला फुले वाहतात, वस्त्राने लपेटतात कारण ग्रंथ हा ग्रंथ नसतो तर देव आहे. ग्रंथाचे महत्व आपल्या शीख बांधवांनी उत्तमरीत्या जपले आहे. परमार्थ म्हणजे सोने आहे. सोन्याचा पर्वत आहे. सोन्यासारखी माणसं जिंकायची असतात.


अ‍ॅड. विष्णू महाराज पारनेरकर
पूर्णवाद भवन, पारनेर

 

Web Title: Sankalpa's Data Narayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.