संस्कारांची शिदोरी भारी.. यशाची उत्तुंग भरारी..!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 09:03 PM2020-01-25T21:03:24+5:302020-01-25T21:04:52+5:30
जीवनात संस्कार महत्त्वाचे आहेत.चांगल्या जीवनासाठी आयुष्यात शिस्त व चांगले संस्कार असणं गरजेचं
मोठ्या धावपळीनंतर तो कार्यालयात पोहचला त्यांची आज पहिली मुलाखत होती. तो घराबाहेर निघताना विचार करीत होता व त्याची इच्छा होती. जर आज माझी मुलाखत यशस्वी झाली तर माझ्या गावाला सोडून येथे शहरात स्थायिक होईल. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते परत झोपेपर्यंत आईवडिलांच्या रोजच्या कटकटीपासुन मुक्तता मिळेल.सकाळी झोपेतून उठलो की अगोदर अंथरूण आवरा. मग बाथरूममध्ये जा,बाथरूमच्या बाहेर निघत नाही कि मातोश्रीचे फर्मान "नळ बंद केला का ?टाँवेल जागेवर ठेवला की दिला फेकुन? नाश्ता करून घराबाहेर निघालो कि लगेच वडिलांचा आवाज"पंखा बंद केला की चालुच आहे ?"काय काय ऐकावे नुसता वैताग आला यार...नौकरी मिळाली की घर सोडून देईल व शहरात राहील......
आँफिसच्या दरवाज्याजवळ कोणीच नव्हते , बाजूला ठेवलेल्या वाटर कूलर मधून पानी टपकत होते ,ते पाहून वडीलांचे रागावणे आठवले , म्हणून वाँटर कुलरचा नळ व्यवस्थित बंद केला गळणारे पाणी बंद केले ,समोर बोर्ड वर लीहलेले होते तुमचा इंटरव्यू वरच्या मजल्यावर आहे....
जिन्यातील लाइट चालुच होता तो बंद करून पुढे सरकलो तर रस्त्यात एक खुर्ची पडलेली होती ती जागेवर व्यवस्थित उभी केली व वरच्या मजल्यावर पोहोचलो व पाहिले की आपल्या अगोदर बसलेले उमेदवार बाँसच्या कँबिनमध्ये जात होते व लगेच बाहेर पडत होते....तेथे मुलाखत देऊन बाहेर आलेल्या उमेदवारास विचारल्यावर कळले की , बॉस फाइल पाहुन काहीच प्रश्न विचारत नाहीत आणि परत पाठवुन देत आहेत . असे समजले. माझा नंबर आला व मला मुलाखतीसाठी बोलावले. मी दरवाजा वाजवून विचारले , आत येऊ का सर ? " एस कम इन " आतुन आवाज आला . बसण्यासाठी सुचना मिळाल्यानतंर खुर्चीवर बसलो आणि माझी फाईल पुढे केली.
....
फाईल मधील माझ्या कागदपत्रावर नजर मारत असताना कोणताही प्रश्न न विचारता बॉसने विचारले "केव्हा ज्वाइन करत आहात ?"बाँसच्या या प्रश्नाने मी चक्रावलो. मला वाटले ते माझी गंमत करत आहेत. माझा चेहरा पाहून ते म्हणाले मी गंमत करीत नाही ही वास्तविकता आहे .आजच्या मुलाखतीतून कोणालाही कोणताच प्रश्न विचारला नाही. फक्त सीसीटीव्हीमध्ये मुलाखतीमध्ये आलेल्या उमेदवारांच्या हालचालीमध्ये सर्व काही पाहिले. मुलाखतीसाठी बरेच जण आले,वाँटर कुलरचे गळणारे पाणीसर्वानी पाहिले पण त्याकडे दुर्लक्ष केले. व्हतुम्ही ते बंद केले तसेच व्हरंड्यातील जळणारा लाईट कोणीच बंद केला नाही तो लाईट तुम्ही बंद केला.मध्येच ररस्त्यात पडलेली खुर्ची तुम्ही उचलली.धन्य तुमच्या पालकांना , ज्यांनी तुम्हाला चांगले व उत्तम संस्कार केले.
कितीही हूशार असला ,चतुर असला पण संस्कारात कमी असाल तर ती व्यक्ती मैनेजमेंट आणि जीवनातील घौडदौडीत यशस्वी होऊ शकत नाही.घरी जाऊन आई वडीलांच्या गळ्यातच पडलो आणि त्यांची माफी मागून त्यांना सर्व काही सांगितले तुम्ही केलेल्या संस्कारामुळेच आज मला ही नौकरी मिळाली. आपल्या जीवनात रोज रोज लहान सहान बाबीवर बोलणारे ,नेहमी सुचना देणाऱ्या आई वडीलाकडुन मला जी शिस्त मिळाली. ती अनमोल आहे . या संस्कारक्षम शिस्तप्रिय संस्कारापुढे मी मिळवलेली पदवीची काहीच हैसियत नाही.जीवनात फक्त शिक्षणच महत्त्वाचे नाही तर त्यासोबत आई वडीलांची शिकवण व संस्कार महत्त्वाचे आहेत...
जीवनात संस्कार महत्त्वाचे आहेत.चांगल्या जीवनासाठी आयुष्यात शिस्त व चांगले संस्कार असणं गरजेचं आहे. आयुष्याची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी शिस्त अंगात बाणा. शिस्तीनेच समृद्धी मिळेल.या संस्कारासाठी आई वडिलांच व शिक्षकांच फार मोठ योगदान असेल तरच भावी पिढी सुखी व आनंदी होईल .