साधकाची दशा उदास असावी (भज गोविन्दम्-३)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 05:26 PM2020-05-14T17:26:12+5:302020-05-14T17:26:25+5:30

स्त्री देह म्हणजे स्तन अथवा नाभीदेशच का? ते शरीर पाहून मोहावेशाने त्यात तू गुंतून पडू नकोस. कारण हा देह, हे अवयव म्हणजे मांस पेशींचा समूह आहे. याविषयी लोभ बाळगू नकोस. शरीर म्हणजे मांसाचा गोळा आहे. या देहाकाराला भुलू नकोस. मनात वारंवार विचार कर. उगाच विकारवश होऊ नकोस. गोविंदाचे स्मरण कर, भज गोविंदम्...भज गोविंदम्.

The seeker's condition should be sad (Bhaj Govindam-3) | साधकाची दशा उदास असावी (भज गोविन्दम्-३)

साधकाची दशा उदास असावी (भज गोविन्दम्-३)

Next

          नारीस्तनभरनाभिनिवेशं मिथ्यामायामोहावेशम्
         एतन्मांसवसादिविकारं मनसि विचारय वारंवारम॥४

श्री शंकराचार्य म्हणतात, अरे मूढा ! स्त्री देह म्हणजे स्तन अथवा नाभीदेशच का? ते शरीर पाहून मोहावेशाने त्यात तू गुंतून पडू नकोस. कारण हा देह, हे अवयव म्हणजे मांस पेशींचा समूह आहे. याविषयी लोभ बाळगू नकोस. शरीर म्हणजे मांसाचा गोळा आहे. या देहाकाराला भुलू नकोस. मनात वारंवार विचार कर. उगाच विकारवश होऊ नकोस. गोविंदाचे स्मरण कर, भज गोविंदम्...भज गोविंदम्.


    जगदगुरु श्री. संत तुकाराम महाराजांचा एक मोठा मार्मिक अभंग आहे. ते म्हणतात, 

साधकाची दशा उदास असावी ।
उपाधि नसावी अंतर्बाह्य ॥१॥

एकांति लोकांती स्त्रियांसी भाषण।

प्राण गेल्या जाण बोलू नये ॥२॥


   स्त्रीदेह वाईट नाही, तर त्या देहाविषयी असणारी आसक्ती वाईट आहे. खरे तर प्रत्येक साधकाच्या साधनेत बाधा निर्माण करीत असते. असे अनुभव प्रत्येक संताच्या जीवनात आलेले आहेत. तुकाराम महाराजांच्या जीवनात काही कंटकांनी मुद्दाम जाणीवपूर्वक विघ्न आणले होते. एका स्त्रीला महाराजांकडे पाठविले. पण महाराजांनी संयमाने तिला उत्तर दिले. जाई वो माते न करि सायास । आम्ही विष्णुदास तसे नव्हो ॥ आतून आसक्ति जर गेली तर स्त्री काही करीत नाही. कारण कोणताही विषय अगोदर अंत:करणात उत्पन्न होतो. मग तो इंद्रियाद्वारे तो विषयापर्यंत जाउन भोग भोगीत असतो. विषय अंत:करणातच उत्पन्न झाला नाही तर तो भोगण्याची ईच्छाच निर्माण होत नाही. संत म्हणतात,

निद्रितापासी / साप तसी उर्वसी ॥ 
स्त्री ही तपस्वी योग्याचीही तपश्चर्या भंग करते. हे खरे नाही तर तिच्याविषयी असणारी भोगवासना, आसक्ती तपश्चर्या भंग करते. श्री. संत एकनाथ महाराज भागवतात फार छान सांगतात. 


वेदे न करिता प्रेरणा । विषयावरी सहज वासना । स्वभावे सकळ जना । सदा जाण सर्वांसी ॥२०८॥
मांससवना मद्यपाना । मिथुनीभूत मैथुना । ये अर्थी सर्व जना । तीव्र वासना सर्वदा ॥२०९॥
आवरावाया योनिभ्रष्टा ।मैथुनी विवाह प्रतिष्ठा । लावूनिया निजनिष्ठा । वर्ण वरिष्ठा नेमिले ॥२१९॥
ब्राह्मण जाता रजकीपासी । ते तव कडू न लागे त्यासी । रजक जाता ब्राह्मणीपासी । तिखट त्यासी तेन लगे ॥२२० ॥अ. ५वा॥

  नातिस्नेह: प्रसंग? वा कर्तव्य: क्वापि केनचित।...(अ.१७/श्लो.५२)यावर नाथ महाराज भाष्य करतांना म्हणतात, 

संसारदु:खाचे मूळ । स्त्रिआसक्तिच जाण केवळ । 
स्त्रिलोभाचे जेथ प्रबळ बळ । दु:ख सकळ त्यापासी ॥५४७॥ 
आसक्ति आणि स्नेहसूत्र । या दोन्हीपासाव द:खासी पात्र । 
संसारी नर होताती ॥५४८॥ 
  
दु:खाचे खरे मुळ म्हणजे आसक्तिच आहे. म्हणून आसक्तिचा नाश करायला सांगितले आहे. पंचदशीमध्ये दोन सृष्टी सांगितल्या आहेत. पहिली-ईश स्रुष्टि  आणि दुसरी जीव सृष्टी. जीव स्रुष्टी ही जीव सृष्टीच्या दु:खाला कारणीभूत असते. ईश निर्मित स्त्री दु:ख देत नाही तर ‘माझी’ स्त्री  दु:ख  देते. माझेपणा आला की दु:ख होते. आसक्ति जर जावी असे वाटत असेल तर जन्म, जरा, व्याधि, दु:ख दोषानुदर्शनं॥ 
वैराग्याशिवाय आसक्ती जाणार नाही. वैराग्य हवे असेल तर भोगातील दोष कळावेत. दोष कळाले की वैराग्य होत असते. भर्त्रुहरी शतकामध्ये श्लोक आहे तो म्हणतो. 


स्तनौ मांसग्रन्थी कनककलशावित्युपमितौ,
     मुखं श्लेष्मागारं तदपि च शशांकेन तुलितम ।
स्त्रवन्मूत्रक्लिन्नं करिवरकरस्पर्धि जघन-
       महो निन्द्यं रुपं कविजन विशेषर्गुक्रुतम ॥


   स्तन म्हणजे मांसाचे गोळे त्याला कलश, लाळेने भरलेले तोंड. त्याला मुखचंद्रमा आणि मुत्राने भरलेल्या जांघांना गजेंद्राची सोंड  म्हणणाºया कवीच्या अद्न्याचा विस्मय होतो.
   स्त्री ही उपभोग्य वस्तू म्हणून अवमूल्यन केले. परंतु श्री शंकराचार्यांनी त्याला सुंदर अर्थ प्रदान केला आहे. स्त्री म्हणजे माता, देवी या रुपात ते पाहातात. अन्न्पुर्णास्तोत्र, भवान्यष्टक, देव्यपराधक्षमापन आदी स्तोत्र ही उत्तम उदाहारणे आहेत. गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि॥ किंवा कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ॥ मातेचा अशा प्रकारे गौरव क्वचितच कुठे केला गेला असेल. स्त्री ही भोगवस्तू नसुन ती पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर काकणभर पुढेच आहे. खरे तर पुरुषापेक्षा तीची शक्ती जास्त म्हणावी लागेल. कारण ती जन्म देउ शकते. उत्पत्ती करु शकते.  स्त्रिशिवाय पुरुष अपूर्ण आहे. शिव-शक्ति दोन नाहीत.  पुरुष-प्रक्रुती दोन नाहीत. (अनुभवामृताचे पहिले पाच श्लोक वाचावेत) 
दया, क्षमा, ध्रुती आदी सात शक्ती विभुतींचे गीतेतील वर्णन वाचले की मग स्त्रिची महती लक्षात येते. आज स्त्रि जीवनाचे जे विकृत चित्रण केले गेले आहे, त्याला काही अंशी स्त्रियासुध्दा जबाबदार आहेत. विक्रुतीलाच संस्क्रुती म्हणण्याची वाईट पद्धत अस्तित्वात आली आहे. नग्नतेलाच सौदर्य समजण्यात धन्यता मानतात. विकृत जाहिरातींना स्त्रियांनी प्रतिसाद न देता मर्यादेतील सौंदर्याचा सन्मान केला पाहिजे, असे जर होइल तर समाजात सुखी -समाधानी समाज अस्तित्वात येइल आणि गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट होईल. 

- भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले 
गुरुकुल भागावाताश्रम ,चिचोंडी(पा)ता. नगर 

 

Web Title: The seeker's condition should be sad (Bhaj Govindam-3)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.