आई-वडीलांच्या सेवेमुळेच जीवनात सुख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 02:37 PM2019-03-30T14:37:26+5:302019-03-30T14:40:21+5:30

जीवनात सुखी व्हायचे असेल, पारलौकीक जीवन सुध्दा सुखमय करायचे असेल तर आपल्याला दिवसातून एकवेळ अवश्य आई-वडीलांचा चरण स्पर्श करणे ...

The service of the parents is happiness in life? | आई-वडीलांच्या सेवेमुळेच जीवनात सुख!

आई-वडीलांच्या सेवेमुळेच जीवनात सुख!

Next

जीवनात सुखी व्हायचे असेल, पारलौकीक जीवन सुध्दा सुखमय करायचे असेल तर आपल्याला दिवसातून एकवेळ अवश्य आई-वडीलांचा चरण स्पर्श करणे खुप आवश्यक आहे. जर आई-वडील हयात नसतील किंवा तुमच्यापासून दूर राहत असतील तर मनातल्या मनात त्यांना आठवून नमन करणे आवश्यक आहे. मी पाहिलं आहे की, लोक मंदीरात जावून ईश्वराचे दर्शन घेतात, राजकारणी लोकांच्या-नेत्यांच्या पायावर नतमस्तक होतात, आपल्या गुरूच्या पायांवरही लोळण घेतात. परंतु आई-वडीलांच्या पायावर कधीच डोकं ठेवत नाही.

जर आपण आईवडीलांची सेवा करू शकत नाही तर देशाची व लोकांची सेवा सुध्दा करू शकणार नाही. बरेच लोक श्रध्दा विहिन असल्यासारखे यंत्रवत आई-वडीलांचे चरण स्पर्श करतात. जसे काही औपचारिकता पुर्ण करीत आहे. आई-वडीलांना नमस्कार करणे तेव्हाच सार्थकी लागेल जेव्हा पुर्ण श्रध्देने चरण स्पर्श केला जाईल.

आई-वडीलांची आज्ञा ऐकणे, त्यांचे मन न दुखवणे हे आपले परम कर्तव्य आहे. जर आपण आई-वडीलांची सेवा अंत:करणापासून करीत असाल तर आपले जीवन सुखी संपन्न राहील. आपला आत्मविश्वास  वृध्दीगंत होईल. ज्याचे मन आणि आत्मा प्रबल आहे अशा व्यक्तिस कुणीच हरवू शकत नाही. 

आजची सुशिक्षित पिढी आई-वडीलांची सेवा करण्यात स्वत:ला कमी समजतात. परंतु हे लक्षण चांगले नाही. शास्त्र-पुराणे, धर्मग्रंथात असे सांगितले आहे की, प्रथम गुरू-माता नंतर पिता, तिसरा गुरू शिक्षक किंवा परमात्मा होय. आपण एकवेळ देवाची-ईश्वराची सेवा न केलेली चालेल. परंतु आई-वडीलांच्या सेवेत कुठलीच कुचराई होवू देवू नका.

आपले आई-वडील हे जागृत देव आहेत. आई-वडील व गुरूवर जर श्रध्दा नसेल तर त्या परमात्म्यावर श्रध्दा ठेवून काय कामाची? परमात्मा सुध्दा तेव्हाच प्रसन्न होईल जेव्हा तुम्ही आई-वडीलांची सेवा कराल. जे आई-वडीलांचा अपमान करतात. तिरस्कार करतात अशा लोकांची पूजा-प्रार्थना तो भगवंत-परमात्मा कधीच ऐकत नाही. म्हणून आई-वडीलांच्या सेवेत त्यांच्या चरणांशीच आपला स्वर्ग-मोक्ष हा साकारला आहे. 

- सविता तायडे

शिक्षिका, खामगाव.
 

Web Title: The service of the parents is happiness in life?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.