शिवमानसपूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 05:22 AM2019-03-08T05:22:32+5:302019-03-08T05:22:38+5:30

आदिशंकराचार्यांनी अनेक स्तोत्रे लिहिली, त्यापैकी एक शिवमानसपूजा स्तोत्र. शिवाची मनोमन पूजा करायची.

Shivaanas worship | शिवमानसपूजा

शिवमानसपूजा

googlenewsNext

- शैलजा शेवडे
आदिशंकराचार्यांनी अनेक स्तोत्रे लिहिली, त्यापैकी एक शिवमानसपूजा स्तोत्र. शिवाची मनोमन पूजा करायची. भक्तीचे जे नवविध प्रकार आहेत, त्यापैकी एक पूजन आहे. बाह्यपूजेसाठी सगळी सामग्री जमवावी लागते; पण मानसपूजा करताना धनाची, बाह्य साधनांची गरज लागत नाही. मनानेच सर्व उपचार कल्पायचे असतात, मन लवकर एकाग्र होते. शिवमानसपूजेचे हे स्तोत्र शांतचित्ताने डोळे मिटून म्हटले, तर खरोखरच अत्यंत आनंद मिळतो. या स्तोत्रात सुरु वातीला पूजाविधी सांगितले आहेत. देवाला आवाहन करून म्हणायचे, ये, शिवा, तुझ्याकरता रत्नांनी मढविलेले सिंहासन तयार केले आहे. त्यावर बैस. तुझ्या स्नानासाठी थंडगार पाणी आहे, तुला स्नान घालतो. उत्तमोत्तम वस्त्रे घालतो, तुला सुगंधी फुले, धूप, दीप अर्पण करतो. नवरत्नांनी मढविलेल्या ताटात पंचपक्वानांचा नैवेद्य भक्तीभावाने अर्पण करतो, तुला साष्टांग नमस्कार घालतो, नृत्य, संगीत अर्पण करतो. माझी पूजा संकल्पपूर्वक, भक्तीभावाने करत आहे, स्वीकार कर. या पुढचे श्लोक अतिशय महत्त्वाचे आहेत. किती उच्च पातळीवरची पूजा स्तोत्रात वर्णिली आहे ही. ‘देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर’ या अभंगाची आठवण येते. त्याचा अनुवाद, प्रत्येक क्षणी मनात परमेश्वर, त्यामुळे आपला देह त्याचे मंदिर होते. आपली प्रत्येक क्रि या त्याची पूजा होऊन जाते. किती सुंदर भाव...! हे करुणाकर श्री महादेव शंभो, माझ्या हातून कळत-नकळत जे प्रमाद घडतात, त्याबद्दल तू मला उदार मनाने क्षमा कर. कारण तू करुणेचा सागर आहेस. मानसपूजा कशी करायची, हे शिकवल्याबद्दल आदिशंकराचार्यांना प्रणाम.

 

Web Title: Shivaanas worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.