अवकाशीय दृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 01:56 AM2019-01-03T01:56:21+5:302019-01-03T01:56:32+5:30
प्राणिक व अवकाशीय दृष्टी एखाद्या माणसाला घन पदार्थाच्या आरपार बघण्याची दृष्टी देते. ज्या माणसाला प्राणिक शक्तींची देणगी असते, तो माणूस आतील अवयवांच्या आरपार बघू शकतो.
- डॉ. मेहरा श्रीखंडे
प्राणिक व अवकाशीय दृष्टी एखाद्या माणसाला घन पदार्थाच्या आरपार बघण्याची दृष्टी देते. ज्या माणसाला प्राणिक शक्तींची देणगी असते, तो माणूस आतील अवयवांच्या आरपार बघू शकतो. ही शक्ती रोगांचे निदान करण्यातही खूप मदत करू शकते. प्राणिक शक्ती ही माणसाला पऱ्या, वामनमूर्ती राक्षस यांना, ज्यांना प्राणिक आवरणाची देणगी असते, असे नैसिर्गक आत्मे त्यांना बघण्यास मदत करतात.
दुहेरी प्राणायम कोषाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, त्यात चक्रांचे (चाकांना असणारा संस्कृत शब्द) किंवा शक्ती केंद्रांचे असणे. सात चक्रे जी प्राणमय कोषाच्या पृष्ठभागी असतात, त्यांना ती ज्या अवयवांच्या जवळ असतात, त्यांची नावे दिलेली असतात. ते एक/पाच इंच भौतिक शरीराच्या बाहेर असून, गूढवाद्यांना ती एखाद्या खोलगट बशीसारखी फिरणाºया प्राणमय तत्त्वाची दिसतात. दैवी शक्ती असणाºया माणसाची चक्रे हळूहळू फिरतात. विज्ञानमय शरीराच्या मध्यभागी जे चक्र असते, त्याच्या बिंदूवर ही सात विज्ञानमय कोषांची चार प्रतलीय चक्रे असतात. प्राणमय कोषांच्या चक्र ांची कामे - प्राणमय व भौतिक शरीराला प्राण घेऊन तो वाटणे, भौतिक चेतनेला विज्ञानमय प्रतलावरील विज्ञानमय कोषातील स्मृती आणून देणे.
भौतिक शरीर हे सात शरीरांपैकी फक्त एकच शरीर आहे़ न बघितलेल्या सत्याशी संबंधित असलेली अतींद्रिय शरीरे ही माणसाच्या भौतिक शरीराचाच भाग आहेत. जीवनात नुसते वाहात जाण्यापेक्षा सत्याच्या पलीकडील भाग उलगडून बघितला पाहिजे. ध्यानधारणा शरीरातील ऊर्जाचक्रे चालू करतात व योग आणि प्राणायाम यात आपली मदत करतात. जास्त शक्ती प्रदान करताना व तणाव कमी करतानाच ती आपल्याला अंतर्दृष्टी देते व आपणास आपली कामे व्यवस्थित करण्यास मदत करते. ती मेंदू व मज्जासंस्था जागृत करतात व जीवनप्रवाह वाढविण्यास मदत करतात. दैवी जागृतावस्थेत पोहोचलेला माणूस आपल्या व दुसºयांच्या भविष्यात डोकावू शकतो. भौगोलिक संपत्तीपेक्षा दैवी संपत्ती खूप मोठी संपत्ती आहे. गूढवादाला एक चांगली व वाईट बाजूही आहे. त्याच्या अस्तित्वाला नाकारण्यापेक्षा त्याच्या चांगल्या बाजू विचारात घेऊन काम करणे कधीही चांगले. आपल्या जगाच्या आत असंख्य जगे आहेत व भौतिक परिस्थिती पलीकडेच खरे सत्य आहे. आपण मानव या सत्यापासून व दैवी शक्तींपासून फार दूर राहू शकत नाही.