आध्यात्मिक गुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 06:28 AM2018-11-26T06:28:31+5:302018-11-26T06:28:42+5:30

- डॉ. मेहरा श्रीखंडे अनेक कोटी वर्षांपासून ‘आत्मा व त्याचे अमरत्व’ हा विषय चर्चेत असूनही कोणीही आत्म्याच्या मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल काहीही ...

Spiritual guru | आध्यात्मिक गुरू

आध्यात्मिक गुरू

Next

- डॉ. मेहरा श्रीखंडे


अनेक कोटी वर्षांपासून ‘आत्मा व त्याचे अमरत्व’ हा विषय चर्चेत असूनही कोणीही आत्म्याच्या मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल काहीही सांगू शकलेले नाही. अजूनही आत्मा, अवकाशीय प्रतल, विज्ञानमय शरीर, स्वर्ग, नरक, ईश्वर इत्यादी गोष्टी सिद्ध करू शकतील अशा गोष्टी सापडलेल्या नाहीत. ‘अवकाशीय प्रतलाचे जग’ हा विषय आपले विचार शास्त्रीय संशोधन याद्वारे सिद्ध करण्याची गोष्ट नाही. त्यामुळे अनंत काळापासून मानवाने जरी या प्रश्नांची उकल करण्यासाठी प्रयत्न चालविला असला तरी पटेल असा निष्कर्ष अजून तरी निघालेला नाही.

जगाच्या वेगवेगळ््या भागात आध्यात्मिक गुरू असलेली संस्कृती हे मान्य करते की, आत्म्याची विश्रांतीची जागा एकतर स्वर्ग किंवा नरक अथवा दोघांच्या मध्ये असेल. आध्यात्मिक गुरू किंवा जादू येत असलेला वैद्य हा तो माणूस असतो जो श्वासाच्या क्रियांनी अथवा इतर पद्धतींनी जिवंत आणि मृत जगात वावरू शकतो. आध्यात्मिक गुरू अतिंद्रिय शक्तीने भरलेले असून त्यांचा उपयोग करून तो रोग्याला बरे करतात व भविष्यही सांगू शकतात. जिवंतपणीही आत्म्याला एक वेगळेपण असते असे वेगवेगळ््या संस्कृती, तत्त्वज्ञाने,ऋ षीमुनी व पृथ्वीच्या सुरुवातीच्या संस्कृती मानतात. क्रो-मॅगनन मानव मृत व्यक्तीबरोबर अन्न व शस्त्रही गाडत असे.मृत झाल्यावरच्या जीवनासंबंधी पछाडलेली पहिली संस्कृती म्हणजे इजिप्शियन संस्कृती. ते मृत व्यक्तीच्या प्रेतामध्ये मसाला घालून ते जतन करून त्याला सोने, मौल्यवान दगडांबरोबर गाडत असत. त्यांच्या थडग्यावरील भितींवरही लिहीत असत व लव्हाळ््याच्या कागदाच्या गुंडाळीवर लिहून तीही सोबत गाडत असत. काही इजिप्शियन कागदाच्या गुंडाळ््यांमध्ये मानवी शरीराला पक्ष्याचे डोके असलेला मृत प्राणी व्यक्तीभोवती रेंगाळत राहून त्याच्या आत्म्याला खालील जगात पोहचवत आहे, असे दाखविलेले आहे.

इजिप्शियन लोकांनी जीवनानंतरच्या जगाची व अवकाशीय प्रतलाची ओसिरिसच्या मेलेल्यांच्या राजाच्या राज्याची बरोबरी केली होती. हे कोडे ग्रीक तत्त्ववेत्ते सॉक्रेटिस, प्लेटो व पायथॅगोरस यांनीही सोडविण्याचा प्रयत्न केला होता. नचिकेताने हा प्रश्न कठापनिषदात उपस्थित केला आहे. यमाने (मेलेल्यांच्या देवाने) दिलेले अनेक वर नाकारून नचिकेताने मेल्यानंतर आत्म्याचे काय होते, या प्रश्नाचा हट्ट धरला. प्रत्येकातील आत्मा काही काळापुरताच त्या परमात्म्याशी विलीन होतो. आत्म्याच्या मरणानंतरच्या स्थितीचा ‘सोसायटी फॉर सायिककल रिसर्च’ या इंग्लंड व अमेरिकेतील संस्थेचे संशोधक शोध घेत आहेत.

Web Title: Spiritual guru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.