ब्रह्म मुहूर्ताची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:28 AM2018-11-22T00:28:48+5:302018-11-22T00:28:58+5:30

आपण सूर्यास्त ते सूर्योदय हा कालावधी रात्र म्हणून गृहीत धरला, तर रात्रीचा शेवटचा एक चतुर्थांश भाग म्हणजे ब्रह्म मुहूर्ताचा काल साधारणपणे रात्री ३.३0 ते पहाटे ५.३0 किंवा ६.00, किंवा सूर्योदयाच्या वेळेपर्यंत.

Time of Brahma Muhurta | ब्रह्म मुहूर्ताची वेळ

ब्रह्म मुहूर्ताची वेळ

googlenewsNext

- सद्गुरू जग्गी वासुदेव

प्रश्न: ब्रह्म मुहूर्ताची नक्की अचूक वेळ काय आहे? त्याचे महत्त्व काय आहे आणि आपण त्या वेळात जास्तीतजास्त ऊर्जा कशी प्राप्त करून घेऊन शकतो?
ब्रह्म मुहूर्ताचा कालावधी
सद्गुरू : आपण सूर्यास्त ते सूर्योदय हा कालावधी रात्र म्हणून गृहीत धरला, तर रात्रीचा शेवटचा एक चतुर्थांश भाग म्हणजे ब्रह्म मुहूर्ताचा काल साधारणपणे रात्री ३.३0 ते पहाटे ५.३0 किंवा ६.00, किंवा सूर्योदयाच्या वेळेपर्यंत.
ब्रह्म मुहूर्ताच्या काळामध्ये काय घडते?
पृथ्वीचे सूर्य आणि चंद्राबरोबरचे नाते अशा स्वरूपाचे आहे की, मानवी शरीरात या काळात काही विशिष्ट शारीरिक बदल घडून येतात. वैद्यकीय शास्त्राने असेदेखील शोधून काढले आहे की, तुमच्या शरीरातील मलपदार्थ, उदाहरणार्थ लघवीमध्ये या काळात काही विशिष्ट गुणधर्म आढळून येतात, जे दिवसाच्या इतर कोणत्याही कालावधीमध्ये सापडत नाहीत.
याविषयी पुष्कळ संशोधन झालेले आहे. संपूर्ण शरीर विशिष्ट अशा अनुकूल वातावरणात असते आणि नैसर्गिकरीत्या पिनियल ग्रंथीमधून स्त्रवणारे मेलाटोनिन नावाचे रासायनिक द्रव्य तयार होत असते. आपल्याला याचा उपयोग करून घेता येतो. कारण ब्रह्म मुहूर्ताच्या काळात पिनियल ग्रंथीमधून हा स्त्राव सर्वाधिक प्रमाणात होत असतो, ज्यामुळे आपल्या शरीर यंत्रणेला एक सहज स्थैर्य प्राप्त होऊ शकते.
आधुनिक वैद्यकीय शास्त्रात, मेलाटोनिनकडे मानसिक स्थितीचे नियंत्रक म्हणून बघितले जाते. अनेक वेळा मी तुम्हाला स्वत:मध्ये सहजता आणण्याबद्दल सांगितले आहे. सहजता आणणे म्हणजे तुमच्यात कुठलीही अस्थिरता राहिलेली नाही. ही सहजता ब्रह्म मुहूर्ताच्या काळात नैसर्गिकरीत्या साध्य होते. या काळात शरीर आणि विचार यांचा सुंदर मेळ घालता येतो. विचारांवर नियंत्रण मिळविता येते. मन स्थिर करता येते. म्हणून ब्रह्म मुहूर्ताला महत्त्व आहे.
या वेळेत, आध्यात्मिक साधना केल्याने त्याचा सर्वाधिक फायदा मिळतो. ब्रह्म मुहूर्त म्हणजे ‘निर्मात्याचा काळ’. आपण त्याकडे या प्रकारे पाहू शकतो: ही अशी वेळ आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वत:ला पुन्हा नव्याने घडवू शकता. तुम्ही स्वत:च ब्रह्मण (निर्माता) बनू शकता आणि स्वत:ला हवे त्या प्रकारे घडवू शकता.

Web Title: Time of Brahma Muhurta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.