आज विजयादशमी... चला, सीमोल्लंघन करूया !

By दा. कृ. सोमण | Published: September 30, 2017 06:32 AM2017-09-30T06:32:11+5:302017-09-30T06:38:33+5:30

आज शनिवार, ३० सप्टेंबर, आश्विन शुक्ल दशमी, विजयादशमी - दसरा, अपराजिता व शमीपूजन, अश्वपूजा, सीमोल्लंघन, सायंकाळी ६-१५ नंतर सरस्वती विसर्जन ! आजचा विजय मुहूर्त आहे दुपारी २.२८ ते दुपारी ३.१५ पर्यंत !

Today, Vijayadashmi ... let's do it! | आज विजयादशमी... चला, सीमोल्लंघन करूया !

आज विजयादशमी... चला, सीमोल्लंघन करूया !

googlenewsNext

आज शनिवार, ३० सप्टेंबर, आश्विन शुक्ल दशमी, विजयादशमी - दसरा, अपराजिता व शमीपूजन, अश्वपूजा, सीमोल्लंघन, सायंकाळी ६-१५ नंतर सरस्वती विसर्जन ! आजचा विजय मुहूर्त आहे दुपारी २.२८ ते दुपारी ३.१५ पर्यंत !

विजयादशमीचा दिवस हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस आहे. त्यामुळे आज कोणत्याही शुभकार्याला प्रारंभ करावा, मौल्यवान वस्तू खरेदीसाठी विजयादशमीचा दिवस शुभ दिवस समजला जातो. पूर्वी या दिवशी पाटीवर सरस्वती काढून पूजा करीत असत. पूर्वी या दिवशी शिक्षणाचा प्रारंभ केला जात असे. आता या दिवशी संगणकाची पूजा केली जाते.
आजचा दिवस सीमोल्लंघनाचा आहे. आळसाकडून उद्योगीपणाकडे, व्यसनाकडून निर्व्यसनाकडे. अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे. भ्रष्टाचाराकडून नीतिमत्ता- प्रामाणिकपणाकडे, बेशिस्तीकडून शिस्तीकडे सीमोल्लंघन करावयाचे आहे. प्रत्येक माणसाला केवळ विजयादशमीच्याच दिवशी नव्हे तर इतर दिवशीही सीमोल्लंघन करावे लागते. प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत, माध्यमिक शाळेतून कॉलेजमध्ये, कॉलेजमधून पदवी घेतल्यावर नोकरीकडे किंवा व्यवसायाकडे, काहींना तर नोकरीसाठी आपल्या देशातून दुसºया देशाकडे सीमोल्लंघन करावे लागते. जीवनात वडील होण्याकडून आजोबा होण्याकडे सीमोल्लंघन करावयाचे असते. महिलांच्या आयुष्यात तर माहेराहून सासरी जाताना मोठे सीमोल्लंघन होत असते. जीवनात लहानपणी बाळगलेली स्वप्ने बाजूला ठेवावी लागतात. जीवनसाथी कसा आहे हे अगोदर जरी कळले तरी खरी ओळख तेथे सासरी राहिल्यानंतरच होत असते. आपल्या आई-बाबांपासून दूर जाताना मनाची किती घालमेल होत असेल ते स्त्री झाल्याशिवाय कुणाला कळणारच नाही. आपल्या आई-वडिलांशी असणारे नाते वेगळे असते. 'तडजोड' करीत 'लोक काय म्हणतील' ही भीती बाळगून गप्प राहायचे असते. नोकरी असेल तर मात्र घर आणि नोकरी सांभाळणे ही तारेवरची कसरत असते. या मुलीचा 'बा' तरी असतो खाली पडल्यावर वरचेवर झेलायला ! इथे तर आपणच तोल सांभाळीत पुढे जायचे असते. पडून चालणारच नसते. बरे रडू आले तर माहेरी मोकळेपणाने रडता तरी येत होते. थोडा वेळ झाला की आई येणार याची खात्री होती. पण सासरी रडू आले तर फक्त बाथरूममध्ये स्वत:ला कोंडून घेऊन रडावे लागते. मनात विचार येतो की मासे पाण्यात कसे रडत असतील. अश्रूंना कशी वाट करून देत असतील ? म्हणून म्हणतो की स्त्रियांचे माहेराहून सासरी जाण्याचे सीमोल्लंघन हे खूप कठीण असते.
विजयादशमीच्या दिवशी वाईटाकडून चांगल्याकडे सीमोल्लंघन करता आले तर चांगले आहे. आपल्यातला वाईटपणा व चांगलेपणा हा आपल्याला तरी नक्कीच ठाऊक असतो. यासाठी विजयादशमीचा दिवस एक संधी असते. त्या संधीचा उपयोग करून आपण अधिक चांगले होऊया. आपल्यात चांगला बदल करूया. कारण 'बदल' हीच विश्वात कायम टिकणारी गोष्ट आहे.

Web Title: Today, Vijayadashmi ... let's do it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dasaraदसरा