Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 12 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 08:17 AM2019-03-12T08:17:56+5:302019-03-12T08:39:14+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
10 क. 23 मि. पर्यंत मेष राशीत मुलांचा जन्म असेल. त्यानंतर वृषभ राशीत मुलं जन्म घेतील. प्रयत्न आणि आधुनिकता यातून प्रगतीची प्रक्रिया सुरू ठेवता येते. पदवी मिळेल आणि प्राप्तीचा प्रभाव राहील. संयम मात्र आवश्यक राहील.
मेष राशी - अ, ल, ई
वृषभ राशी - ब, व, ऊ आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
मंगळवार, दि. 12 मार्च 2019
- भारतीय सौर 21 फाल्गुन 1940
- मिती फाल्गुन शुद्ध षष्ठी 28 क. 50 मि.
- कृतिका नक्षत्र 28 क. 53 मि., मेष चंद्र 10 क. 23 मि.
- सूर्योदय 06 क. 51 मि., सूर्यास्त 06 क. 46 मि.
दिनविशेष
1891 - नटश्रेष्ठ चिंतामणराव कोल्हटकर यांचा जन्म.
1911 - गोवा, दमण-दीव केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बाळकृष्ण बांदोडकर यांचा जन्म.
1911 - कृष्णाजी प्र. खाडिलकर यांच्या संगीत मानापमानचा पहिला प्रयोग.
1913 - महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म.
1930 - मिठाच्या सत्याग्रहासाठी 240 मैलांची महात्मा गांधीजींची दांडी यात्रा सुरू झाली.
1933 - लेखिका, कविता विश्वनाथ नरवणे यांचा जन्म.
1984 - प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल हिचा जन्म.