Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 13 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 08:23 AM2019-03-13T08:23:11+5:302019-03-13T08:33:46+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
वृषभ राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना चंद्र-शुक्र त्रिकोणाचे मिळणारे सहकार्य प्रगती आकर्षक करणारी असेल. संगीत, कला विभागाशी संपर्क राहतो. त्यातून समाज संपर्क प्रबळ होत राहतो.
वृषभ राशी ब, व, ऊ आद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
बुधवार, दि. 13 मार्च 2019
- भारतीय सौर 22 फाल्गुन 1940
- मिती फाल्गुन शुद्ध सप्तमी 28 क. 23 मि.
- रोहिणी नक्षत्र 29 क. 05 मि., वृषभ चंद्र
- सूर्योदय 06 क. 50 मि., सूर्यास्त 06 क. 47 मि.
दिनविशेष
1800 - पेशवाईतील थोर मुत्सद्दी बाळाजी जनार्दन भानू तथा नाना फडणवीस यांचे निधन.
1893 - जागतिक किर्तीचे प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्म.
1899 - प्रसिद्ध कवी दत्त यांचे निधन.
1926 - मराठी साहित्यिक रवींद्र रामचंद्र पिगे यांचा जन्म.
1969 - गणितशास्त्रज्ञ रँग्लर मोहिनीराज लक्ष्मण चंद्रात्रेय यांचे निधन.
1996 - रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शन यावर आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते, नाट्य निर्माते शफी इनामदार यांचे निधन.
2004 - प्रख्यात सतारवादक उस्ताद विलायतखॉ यांचे निधन.