Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, गुरुवार 24 जानेवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 09:35 AM2019-01-24T09:35:02+5:302019-01-24T10:13:39+5:30
व्यावहारिक यशासाठी जिद्द आणि बौद्धिक प्रभाव यांचा उपयोग करता येईल आणि यश व्यापक करता येईल.
23 क. 49 मि. पर्यंत सिंह राशीत मुलं जन्म घेतील. त्यापुढे कन्या राशीची मुलं असतील. व्यावहारिक यशासाठी जिद्द आणि बौद्धिक प्रभाव यांचा उपयोग करता येईल आणि यश व्यापक करता येईल. नवीन नवीन क्षेत्रात प्रवेश करणारी प्रवृत्ती राहील.
जन्मनाव - सिंह राशी म, ट व कन्या राशी प, ठ, ण अद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
गुरुवार, 24 जानेवारी 2019
भारतीय सौर 04 माघ 1940
मिती पौष वद्य चतुर्थी 20 क. 54 मि.
पूर्वा नक्षत्र 18 क. 21. मि, सिंह चंद्र 23 क. 49 मि.
सूर्योदय 07 क.16 मि., सूर्यास्त 06 क. 26 मि.
संकष्टी चतुर्थी (चंद्रोद्य 21 क. 53 मि.)
दिनविशेष
1923 - अभिनेत्री हंसा वाडकर यांचा जन्म.
1924 - तत्वचिंतक मे. पु. रेगे यांचा जन्म.
1945 - प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक सुभाष घई यांचा जन्म.
1966 - भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेते डॉ. होमी जहाँगीर भाभा यांचे अपघाती निधन.
2002 - कोऊर येथून एरियन-4 या अग्निबाणाने भारताचा उपग्रह इन्सॅट-3-सीचे यशस्वी प्रक्षेपण केले.
2005 - स्वातंत्र्यसेनानी अनुताई लिमये यांचे निधन.
2011 - शास्त्रीय गायक पंडित भीमसेन जोशी यांचे निधन.