Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 08:15 AM2019-02-26T08:15:17+5:302019-02-26T08:41:19+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
वृश्चिक राशीत जन्मलेली मुलं यश मिळेपर्यंत निर्धाराने आगेकूच सुरुच ठेवतात. अखेर राशिस्थानाचा गुरू त्यात सफलता मिळवून देईल. शिक्षण, अधिकार, प्राप्ती यांचा समावेश त्यात राहील.
वृश्चिक राशी - न, य अद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
मंगळवार, दि. 26 फेब्रुवारी 2019
- भारतीय सौर 07 फाल्गुन 1940
- मिती माघ वद्य अष्टमी, 29 क. 21 मि.
- अनुराधा नक्षत्र 23 क. 03 मि., वृश्चिक चंद्र
- सूर्योदय 07 क. 02 मि., सूर्यास्त 06 क. 42 मि.
दिनविशेष
1886 - समाजसुधारक नर्मदाशंकर दवे यांचे निधन.
1887 - भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचे पुणे येथे निधन.
1908 - प्रसिद्ध लेखिका लीला मु़जुमदार यांचा जन्म.
1936 - निर्माते व दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा जन्म.
1966 - कवी, साहित्यिक, क्रांतिकारकांचे मेरुमणी विनायक दामोदर सावरकर यांचे निधन.
1984 - इन्सॅट-1बीचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते लोकर्पण.
2004 - माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे निधन.