Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 27 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 08:27 AM2019-02-27T08:27:06+5:302019-02-27T08:49:12+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
24 क. 45 मि. पर्यंत वृश्चिक राशीत जन्मलेली मुलं असतील. पुढे धनु राशीत मुलं प्रवेश करतील. निर्धार आणि सामोपचार अशा मार्गांनी मुलं यश मिळवतील. पदवी संपादन करता येईल आणि कार्यवर्तुळं आकर्षक करू शकाल. परिचितांचा परिवार मोठा राहील.
वृश्चिक राशी - न, य, धनु राशी - भ, ध आद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
बुधवार, दि. 27 फेब्रुवारी 2019
- भारतीय सौर 08 फाल्गुन 1940
- मिती माघ वद्य नवमी, अहोरात्र
- जेष्ठा नक्षत्र 24 क. 45 मि., वृश्चिक चंद्र 24 क. 45 मि.
- सूर्योदय 07 क. 02 मि., सूर्यास्त 06 क. 42 मि.
- श्री रामदास नवमी
दिनविशेष
जागतिक मराठी भाषा दिन
1912 - श्रेष्ठ मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार, ज्ञानपीठ प्राप्त विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्म.
1926 - साहित्यिका जोत्स्ना देवधर यांचा जन्म.
1931 - थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचे निधन.
1952 - हिंदी चित्रपट निर्माता प्रकाश झा यांचा जन्म.
1956 - लोकसभेचे पहिले सभापती जी. व्ही. मावळणकर यांचे निधन.
2010 - प्रसिद्ध समाजसेवक नानाजी देशमुख यांचे निधन.