Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 08:18 AM2019-02-28T08:18:24+5:302019-02-28T09:08:10+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
धनु राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना रवि-मंगळ शुभयोगाचे सहकार्य मिळत असल्याने पदवी ते व्यावहारिक वर्तुळं यातील यश महत्त्वाचे ठरेल. प्रवास होत राहतील, परदेशाशी संपर्क येतील.
धनु राशी भ, ध आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
गुरुवार, दि. 28 फेब्रुवारी 2019
- भारतीय सौर 09 फाल्गुन 1940
- मिती माघ वद्य नवमी, 06 क. 41 मि.
- मूळ नक्षत्र 27 क. 06 मि., धनु चंद्र
- सूर्योदय 07 क. 00 मि., सूर्यास्त 06 क. 43 मि.
दिनविशेष
राष्ट्रीय विज्ञान दिन
1897 - संत साहित्याचे अभ्यासक शंकर दामोदर पेंडसे यांचा जन्म.
1926 - स्वातंत्र्य शाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर तथा कवी गोविंद यांचे निधन.
1944 - प्रसिद्ध संगीतकार, गीतकार, गायक रवींद्र जैन यांचा जन्म.
1948 - ग्वॉल्हेर, किराणा, जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका विदुषी पा. तळवलकर यांचा जन्म.
1963 - पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे निधन.
1971 - आंतरराष्ट्रीय धावपटू परमजित सिंग यांचा जन्म.
1995 - कवी, गीतकार, कृष्ण गंगाधर दीक्षित उर्फ कवी संजीव यांचे निधन.