Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 8 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 08:55 AM2019-03-08T08:55:12+5:302019-03-08T08:56:40+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
मीन राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना गुरुकृपा आणि चंद्र-शुक्र शुभयोगाचे सहकार्य यातून प्रवास सुरू ठेवावा लागेल. त्यामध्ये सफलतेचा विभाग विशेष राहील. बौद्धिक प्रांताशी कलाक्षेत्राशी संबंध येतील.
मीन राशी द, च आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
शुक्रवार, दि. 8 मार्च 2019
- भारतीय सौर 17 फाल्गुन 1940
- मिती फाल्गुन शद्ध द्वितीया 25 क. 35 मि.
- उत्तरा भाद्रपदा नक्षत्र 23 क. 16 मि., मीन चंद्र
- सूर्योदय 06 क. 54 मि., सूर्यास्त 06 क. 45 मि.
दिनविशेष
1864 - कादंबरीकार, आठव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हरी नारायण आपटे यांचा जन्म.
1911 - जागतिक महिला दिन पहिल्यांदा मानला गेला.
1921 - गीतकार साहीर लुधियानवी यांचा जन्म.
1928 - कथालेखक वसंत अनंत कुंभोजकर यांचा जन्म.
1930 - कवी, कथा-कादंबरीकार, नाटककार चिंतामण त्र्यंबक खानोलकर तथा आरतीप्रभू यांचा जन्म.
1948 - भोर-फलटण संस्थाने मुंबई राज्यात विलीन.
1963 - क्रिकेटपटू गुरुशरणसिंग याचा जन्म.
1974 - अभिनेता फरदिन खान याचा जन्म.