Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 3 एप्रिल 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 07:48 AM2019-04-03T07:48:17+5:302019-04-03T07:48:39+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
20 क.48 मि पर्यंत कुंभ राशीत चंद्र राहील. त्यानंतर मीन राशीत मुलं जन्म घेतील. विज्ञान, प्रथा, परंपरा सांभाळणारी मुलं आहेत. शिक्षणात यश मिळवतील. धार्मिक कार्यातून प्रसन्नता संपादन करु शकतील. पदवी मिळेल, नोकरी, उद्योगात प्रगती होईल.
कुंभ राशी. ग. स. मीन राशी
द.च अद्याक्षर. (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचाग
बुधवार, दि 3 एप्रिल 2019
भारतीय सौर 13 चैत्र 1941
मिती फाल्गुन वद्य त्रयोदशी 10 क. 57 मि
पूर्वा भाद्रपदा नक्षत्र 27 क.24 मि, कुंभ चंद्र 20 क. 48 मि
सूर्योदय 06 क.33 मि. सूर्यास्त 06 क 52 मि.
शिवरात्री
दिनविशेष
1882 - लोकप्रिय मराठी कांदबरीकार द्वारकानाथ माधव पितळे तथा नाथमाधव यांचा मुंबई येथे जन्म
1899 - पत्रकार, विचारवंत पांडुरंग वामन तथा पां. वा गाडगीळ यांचा जन्म
1903 - सुप्रसिद्ध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म
1914 - स्वतंत्र भारताच्या संरक्षण दलाचे पहिले फील्डमार्शल सॅम होरमसजी फ्रामजी जमशेटजी माणेकशा यांना जन्म
1962 - सिनेअभिनेत्री, राजकीय नेत्या जयाप्रदा यांचा जन्म
1973 - नृत्य दिग्दर्शक, अभिनेता प्रभुदेवा यांचा जन्म