Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 25 जुलै 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 08:41 AM2019-07-25T08:41:50+5:302019-07-25T08:43:10+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
आज जन्मलेली मुलं
आजची मुले मेष राशीची असतील. गुरु- मंगळ नवपंम योगातून शनिचे सहकार्य प्रबळ होईल आणि प्रगती वेगाने करता येईल. अनेक क्षेत्रात मेष व्यक्तींचा समावेश राहिल. शिक्षण ते व्यवहार यात प्रचिती येईल. मेष राशी अ, ल, ई अक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचाग
गुरुवार, दि. 25 जुलै 2019
- भारतीय सौर 3 श्रावण 1941
- मिती आषाढ वद्य अष्टमी 19 क. 21 मि.
- अश्विनी नक्षत्र 27 क. 39 मि. मेष चंद्र
- सूर्योदय 06 क. 14 मि., सू्र्यास्त 07 क. 16 मि.
- कालाष्टमी
दिनविशेष
1875 - ब्रिटिश वंशाचा पण भारतीय असलेला निसर्ग, लेखक आणि शिकारी जीम कार्बेट यांचा जन्म.
1880 - राष्ट्रवादी विचारसारणीचे, स्वदेशी चळवळीचे प्रणेते गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांचे पुणे येथे निधन.
1919 - नामवंत मराठी गायक, संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचा जन्म.
1922 - कवी, लेखक प्रा. वसंत बापट यांचा जन्म.
1929 - लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांचा जन्म.
शुभाशुभ चौघडी
दिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी प्रमाण असून पुढे सकाळी सहा प्रमाण धरुन आजच्या चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराच्या सूर्योदय- सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्योदयापासू पुढे करावा.
दिवसा - सकाळी 6 ते 7.30 शुभ, 7.30 ते 9 रोग, 9 ते 10.30 उद्देग, 10.30 ते 12 चंचल, 12 ते 1.30 लाभ, 1.30 ते 3 अमृत, 3 ते 4.30 काल, 4.30 ते 6 शुभ. रात्री - 6 ते 7.30 अमृत, 7.30 ते 9 चंचल, 9 ते 10.30 रोग, 10.30 ते 12 काल, 12 ते 1.30 लाभ, 1.30 ते 3 उद्धेग, 3 ते 4.30 शुभ, 4.30 ते 6 अमृत.