Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, दि. 03 ऑक्टोबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 10:17 AM2019-10-03T10:17:46+5:302019-10-03T10:18:44+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
आज जन्मलेली मुले - वृश्चिक राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र-गुरुतील गजकेसरी योगामुळे शिक्षणात प्रगती करतील. विचारात सात्त्विकता राहील. प्रयत्नाने कार्यपद्धतीत यश मिळवतील. अपरिचित व्यक्ती संस्था यांच्याशी संपर्कात सावध राहावे. चंद्र-नेपच्यून केंद्रयोग आहे. वृश्चिक राशी न, य अद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
गुरुवार ३ ऑक्टोबर २०१९
भारतीय सौर ११ आश्विन १९४१
मिती आश्विन शुद्ध पंचमी १० क. १२ मि.
अनुराधा नक्षत्र १२ क. १० मि., वृश्चिक चंद्र
सूर्योदय ०६ क. ३१ मि., सूर्यास्त ०६ क. २५ मि.
दिनविशेष
१८६७- आधुनिक शिवणयंत्राचा निर्माता इलियस होव यांचे निधन
१८८०- पहिले संगीत नाटक 'शांकुतल'चा पहिला प्रयोग पुण्यात
१९०३- हैदराबादच्या मुक्तिसंग्रामचे नेते व्यंकटेश भगवानराव खेडगीकर ऊर्फ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म
१९०७- 'मराठवाड्याचा चालता बोलता इतिहास' म्हणून सन्मानित करण्यात आलेल्या नरहर शेषराव पोहनेकर यांचा परळी वैजनाथ येथे जन्म
१९११- क्रिकेटपटू सारोबिंदूनाथ बॅनर्जी यांचा जन्म
१९१४- सुप्रसिद्ध समीक्षक म. वा. धोंड यांचा जन्म
१९४९- चित्रपट दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांचा जन्म