Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 4 मे 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 08:41 AM2019-05-04T08:41:00+5:302019-05-04T08:43:18+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
मेष राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र हर्षल युतीमुळे प्रगल्भ विचारांची राहतील. त्यात काही चमत्कारिकपणा असेल. परंतु संग्रह शक्तिमोठी राहील. त्यात परिचितांचा परिवार राहील. उद्योगाची वर्तुळ असतील.
जन्मगाव अ, ल, ई अद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
शनिवार, दि. 4 मे 2019
भारतीय सौर 14 वैशाख 1949
मिती चैत्र वद्य अमावस्या 28 क.16 मी.
अश्विनी नक्षत्र 15 क. 47 मि. मेष चंद्र
सूर्योदय 06 क. 11 मि., सूर्यास्त 07 क. 1 मि.
दश अमावस्या
दिनविशेष
1929 - प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म.
1934 - भावगीत गायक अरूण दाते यांचा जन्म.
1967 - नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे, असा महत्त्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला.
1980 - आधुनिक कवी, चतुरस्त्र लेखक, पत्रकार, नाटककार आत्माराम उर्फ अनंत काणेकर यांचे निधन.
1989 - बंगाली साहित्यिक आशुतोष मुखोपाध्याय यांचे निधन.
2008 - प्रख्यात तबलावादक किसन महाराज यांचे निधन.