Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 5 मे 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 09:57 AM2019-05-05T09:57:03+5:302019-05-05T09:57:38+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
22 क. 30 मी. पर्यंत मुलं मेष राशीत असतील. त्यानंतर वृषभ राशीची मुलं राहतील. विचारात असलेली जिद्द आणि आधुनिकता हीच कार्यप्रवासाची साधने राहतील. शिक्षणात प्रयत्नाने यश, व्यवहारात प्रगल्भता उपयुक्त ठरेल. मेष राशी 'अ', 'ल', 'ई', वृषभ राशी 'ब' व 'ऊ'.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
रविवार, दि. 5 मे 2019
भारतीय सौर 15 वैशाख 1949
मिती वैशाख शुद्ध प्रतिपदा 27 क. 59 मी.
मेष चंद्र 22 क. 30 मि.
सूर्योदय 06 क. 10 मि., सूर्यास्त 07 क. 1 मि.
दिनविशेष
1818- साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता कार्ल मार्क्स यांचा जन्म
1916- भारताचे माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचा जन्म
1918- निसर्गकवी 'बालकवी' तथा त्र्यंबक बापूजी ठोमरे यांचे निधन
1945- गायनाचार्य पं. रामकृष्णबुवा वझे यांचे पुणे येथे निधन
2006- ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक नौशाद अली यांचे मुंबई येथे निधन. त्यांनी 68 चित्रपटांना संगीत दिले. 'मुघल-ए-आझम', 'कोहिनूर', 'बैजू बावरा' या काही उल्लेखनीय कलाकृती