Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 13 एप्रिल 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 09:10 AM2019-04-13T09:10:24+5:302019-04-13T09:11:37+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
आज जन्मलेली मुलं
कर्क राशीत जन्मलेली आजची मुलं चंद्र-मंगळ लाभयोगामुळे कार्यप्रांतात प्रभाव प्रस्थापित करु शकतील. त्यात शिक्षण आणि उद्योग प्रांत यांचा समावेश राहील. समाजकार्याशी संबंध येऊ शकेल.
कर्क राशी ड, ह अद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
शनिवार, दि.13 एप्रिल 2019
भारतीय सौर 23 चैत्र 1941
मिती चैत्र शुद्ध अष्टमी 11 क. 42 मि.
पुनर्वसू नक्षत्र 8 क.59 मि.,कर्क चंद्र
सूर्योदय 06 क. 25 मि., सूर्यास्त 06 क. 54 मि.
श्रीरामनवमी, दुर्गाष्टमी.
दिनविशेष
1951 - औंध संस्थानचे अधीपती श्रीमंत भगवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे निधन
1973 - अभिनेते बलराज सहानी यांचे निधन.
1973 - श्रेष्ठ मराठी संशोधक, लेखक 13 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अनंत काकबा प्रियोळकर यांचे निधन
1993 - लालबहादूर शास्त्री यांच्या पत्नी ललितादेवी शास्त्री यांचे निधन.
2006 - 'महाराष्ट्र देवदासी प्रथा' निर्मूलन विधेयक विधानसेभत मंजूर.
2018 - ज्येष्ठ संगीतकार दशरथ पुजारी यांचे निधन.