Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 24 जुलै 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 08:19 AM2019-07-24T08:19:12+5:302019-07-24T08:27:45+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
आज जन्मलेली मुलं
15 क. 42 मि. पर्यत मीन राशीत जन्मलेली मुले असतील. पुढील मुले मेष राशीत प्रवेश करतील. प्रारंभीच्या मुलांना गुरु- शनिचे सहकार्य घेऊन कार्यभाग साधता येईल. मेष राशीला गुरुचे सहकार्य अल्प प्रमाणात असल्याने समस्यांचा गर्दितून मार्ग शोधावे लागतील. मीन राशी द, च अद्याक्षर, मेष राशी अ, ल, ई अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचाग
बुधवार, दि. 24 जुलै 2019
- भारतीय सौर 2 श्रावण 1941
- मिती आषाढ वद्य सप्तमी 18 क. 5 मि.
- रेवती नक्षत्र 15 क. 42 मि. मीन चंद्र 15 क. 42 मि.
- सूर्योदय 06 क 14 मि., सूर्यास्त 07 क. 16 मि.
दिनविशेष
1911 - स्वातंत्र्यसैनिक पद्यश्री गोविंदभाई श्रॅाफ यांचा जन्म.
1929 - क्रीडा समीक्षक बाळ जगन्नाथ यांचा जन्म.
1932 - प्रख्यात अभिनेते व नाटककार मधुकर देवराम तोरडमल यांचा जन्म.
1937 - हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते मनोज कुमार यांचा जन्म.
1945 - विप्रो कंपनीचे सर्वेसर्वा अझीम हाशिम प्रेमजी यांचा मुंबई येथे जन्म.
1971 - लेखक डॅा. विष्णू नारायण गोखले यांचे निधन.
2000 - हैदराबाद येथील स्पर्धेत एस. विजयालक्ष्मी भारताची पहिली बुद्धिबळपटू ग्रॅण्डमास्टर विजेती झाली.
शुभाशुभ चौघडी
दिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी प्रमाण असून पुढे सकाळी सहा प्रमाण धरुन आजच्या चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराच्या सूर्योदय- सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्योदयापासू पुढे करावा.
दिवस- सकाळी 6 ते 7.30, 7.30 ते 9 अमृत, 9 ते 10.30 काल, 10.30 ते 12 शुभ, 12 ते 1.30 रोग, 1.30 ते 3 उद्वेग, 3 ते 4.30 चंचल, 4.30 ते 6 लाभ, रात्री - 6 ते 7.30 उद्वेग, 7.30 ते 9 शुभ, 9 ते 10.30 अमृत, 10.30 ते 12 चंचल, 12 ते 1.30 रोग, 1.30 ते 3 काल, 3 ते 4.30 लाभ, 4.30 ते 6 उद्वेग.