Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 10 जून 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 09:03 AM2019-06-10T09:03:44+5:302019-06-10T09:04:43+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
20 क. 0 मी. पर्यंत सिंह राशीत मुले असतील. पुढे कन्या राशीत मुलं जन्म घेतील. जिद्द आणि कल्पकता यांच्यातून कार्यभाग साधणारी यंत्रणा मुलं निर्माण करतील आणि शिक्षणापासून प्राप्तीपर्यंत अनेक मार्गांवर यश मिळवतील.
सिंह राशी म, ट, कन्या राशी प, ठ अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
सोमवार, दि. 10 जून 2019
भारतीय सौर, 20 ज्येष्ठ 1941
मिती ज्येष्ठ शुद्ध अष्टमी 22 क. 24 मि.
पूर्वा नक्षत्र 14 क. 21 मि. सिंह चंद्र
सूर्योदय 06 क. 2 मि., सूर्यास्त 07 क. 14 मि.
दुर्गाष्टमी
दिनविशेष
1890 - भारताच्या रविवाराच्या साप्ताहिक सुट्टीला सुरुवात. मुंबईतील गिरणी कामगार संघटनेने साप्ताहिक सुट्टीची मागणी केली होती.
1904 - विचारवंत व लेखक गुरुवर्य पुरुषोत्तम गणेश सहस्त्रबुद्धे यांचा जन्म.
1908 - भारताचे माजी भूसेनाप्रमुख जनरल जयंतनाथ चौधरी यांचा जन्म.
1955 - ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकणारे पहिले भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा जन्म.
1966 - मिग जातीच्या विमानाची नाशिक येथे निर्मिती.
1987 - अभिनेते जीवन यांचे निधन.
1989 - कथा लेखिका कमलाबाई टिळक यांचे निधन.
1991 - बांगलादेशात संसदीय लोकशाहीची स्थापना.