Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 09:39 AM2019-10-11T09:39:04+5:302019-10-11T09:40:04+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
कुंभ राशीतील मुलांच्या सीमारेषा 22 क. 27 मि. वाजेपर्यंत राहतील. त्यापुढे मीन राशीतील मुले असतील. प्रगल्भ विचार आणि शोध घेऊन होणारी कृती याच मार्गातून यश संपादन करतील. काही क्षेत्रात प्रभाव प्रस्थापित करू शकतील
कुंभ राशी ग, स अद्याक्षर
मीन राशी द, च अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019
भारतीय सौर, 19 आश्विन 1941
मिती आश्विन शुद्ध त्रयोदशी 22 क. 20 मि.
पूर्वा भाद्रपद नक्षत्र 29 क. 09 मि. कुंभ चंद्र
सूर्योदय 06 क. 33 मि., सूर्यास्त 06 क. 18 मि.
प्रदोष
दिनविशेष
1902 - सर्वोदयी नेते लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म.
1916 - प्रसिद्ध समाजसेवक नानाजी देशमुख यांचा जन्म.
1916 - अभिनेत्री रतन पेडणेकर उर्फ मीनाक्षी शिरोडकर यांचा जन्म.
1930 - इंग्रजी स्तंभलेखक बेहराम कॉन्ट्रॅक्टर यांचा मुंबई येथे जन्म.
1942 - प्रसिद्ध अभिनेते अमिताभ हरिवंशराय बच्चन यांचा अलाहाबाद येथे जन्म.
1946 - सी-डॅकचे संस्थापक डॉ. विजय भाटकर यांचा जन्म.
1968 - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे महानिर्वाण.