Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - रविवार, 12 जानेवारी 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 11:34 AM2020-01-12T11:34:14+5:302020-01-12T11:34:48+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
पंचाग
रविवार, दि. 12 जानेवारी 2020
- भारतीय सौर 22 पौष 1941
- मिती पौष वद्य द्वितीया 20 क. 19 मि.
- पुष्य नक्षत्र 11क. 50 मि., कर्क चंद्र
- सूर्योदय 07 क. 16 मि., सूर्यास्त 06 क. 18 मि.
दिनविशेष
राष्ट्रीय युवक दिन
1598 - राजमाता जिजाबाई यांचा जन्म.
1863 - भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरविणाऱ्या नरेंद्रनाथ दत्त अर्थात स्वामी विवेकानंद यांचा जन्म.
1902 - महर्षी न्यायरत्न धोंडीराजशास्त्री विनोद यांचा जन्म.
1906 - भारतीय संस्कृतिकोशाचे संपादक महादेवशास्त्री जोशी यांचा जन्म.
1918 - ज्येष्ठ संगीतकार सी. रामचंद्र यांचा जन्म.
1992 - शास्त्रीय गायक कुमार गंधर्व यांचे निधन.
2005 - अभिनेते अमरीश पुरी यांचे निधन.
आज जन्मलेली मुलं
कर्क राशीत जन्मलेली आजची मुले 'प्रयत्नांती परमेश्वर' याच मंत्राने आपले उपक्रम सुरु ठेवू शकतील. त्यात शिक्षण ते अर्थप्राप्ती यांचा समावेश राहील. बालपणी आरोग्य सांभाळावे. माता-पित्यास शुभ. कर्क राशी ड, ह अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी