Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 18 मे 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 07:34 AM2019-05-18T07:34:56+5:302019-05-18T07:36:14+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
20 क. 30 मी. पर्यंत जन्मलेली मुलं तुला राशीत असतील. त्यानंतर वृश्चिक राशीची मुलं असतील. आपल्या कार्यप्रांतात मुलं चमकत राहतील. परिचित, संपर्क विशेष राहतील. शिक्षण प्रांतात यश मिळवतील. शिक्षण प्रांतात यश मिळवतील. तुला राशी 'र', 'त', वृश्चिक राशी 'न', 'य' अक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
शनिवार, दि. 18 मे 2019
भारतीय सौर, 28 वैशाख 1941
मिती वैशाख शुद्ध पौर्णिमा 26 क. 41 मी.
विशाखा नक्षत्र 26. क. 22 मि. तुला चंद्र 20 क. 30 मि.
सूर्योदय 06 क. 5 मि., सूर्यास्त 07 क. 6 मि.
बुद्ध पौर्णिमा
दिनविशेष
1048- गणितज्ञ, खगोलशास्त्र ओमर खय्याम यांचा जन्म.
1913- गोवामुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसेनानी, काँग्रेस नेते पुरुषोत्तम काकोडकर यांचा जन्म.
1962- हिंदुस्थानी संगीतातील आग्रा घराण्याचे विलायत हुसेन खाँ पैगंबरवासी झाले.
1972- महाराष्ट्रातील कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे झाली.
1974- राजस्थानच्या वाळवंटात पोखरण येथ भारताने भूमिगत अणुस्फोट चाचणी केली.
1997- भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई रघुनाथराव गोखले यांचे निधन.
2017- प्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन.