Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 20 मे 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 08:42 AM2019-05-20T08:42:23+5:302019-05-20T08:51:31+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
वृश्चिक राशीत जन्मलेली आजची मुले 26 क. 29 मि. पर्यंतची असतील. त्यापुढे मुलं धनु राशीत प्रवेश करतील. जिद्द, सात्विकता असे विचारप्रवाह त्यांच्याच राहतील. प्रयत्नांती परमेश्वर हा मंत्र कार्यपथावरील प्रवासात उपयुक्त ठरेल.
वृश्चिक न, य, धनु राशी भ, ध अक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
सोमवार, दि. 20 मे 2019
भारतीय सौर, 30 वैशाख 1941
मिती वैशाख वद्य द्वितीया 25 क. 22 मी.
जेष्ठा नक्षत्र 26. क. 29 मि. वृश्चिक चंद्र 26 क. 29 मि.
सूर्योदय 07 क. 4 मि., सूर्यास्त 07 क. 6 मि.
दिनविशेष
1498 - वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी भारताच्या कालिकत बंदरात आला.
1850 - आधुनिक मराठी गद्याचे जनक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म.
1878 - मराठी ग्रंथकार आणि रसिक विद्वान कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे निधन.
1900 - कवि सुमित्रानंदन पंत यांचा जन्म.
1902 - क्युबाचा स्वातंत्र्यदिन.
1932 - पत्रकार, सामाजिक सुधारणावादी बिपीनचंद्र पाल यांचे निधन.
2005 - महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे चार कंपन्यांत विभाजन.