Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 3 मार्च 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 10:37 AM2020-03-03T10:37:28+5:302020-03-03T10:42:32+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
वृषभ राशीतील मुलांचा प्रांत 23 क. 03 मि. पर्यंत राहील. त्यानंतर मिथुन राशीत मुलं जन्माला येतील. आधुनिकता आणि प्रगल्भता यातून मुलांचा प्रवास सुरू राहील. शिक्षण व्यवहार यात प्रारंभापासून प्रयत्न सुरू ठेवावे. योग्य वेळी त्याचा उपयोग करावा.
वृषभ राशी ब, व, ऊ
मिथुन राशी क, छ, घ अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
मंगळवार, 3 मार्च 2020
भारतीय सौर 13 फाल्गुन 1941
मिती फाल्गुन शुद्ध अष्टमी 13 क. 51 मि.
रोहिणी नक्षत्र, 10 क. 32 मि.
सूर्योदय 06 क. 57 मि., सूर्यास्त 06 क. 4 मि.
दिनविशेष
जागतिक वन्यजीव दिन
1839 - टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक जमशेटजी नसरवानजी टाटा यांचा जन्म.
1919 - मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरीकार, 8 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हरी नारायण आपटे यांचे निधन.
1921 - किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर यांचा जन्म.
1923 - इतिहासकार, ललित लेखक, प्रा. सदाशिव नथोबा आठवले यांचा जन्म.
1968 - प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांचा जन्म.
1928 - कवी व लेखक पुरुषोत्तम पाटील यांचा जन्म.
2000 - मराठी चित्रपट अभिनेत्री रंजना देशमुख यांचे निधन.