Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 4 जुलै 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 09:53 AM2019-07-04T09:53:04+5:302019-07-04T09:53:50+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
कर्क राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना चंद्राची बुध मंगळाशी होणारी युती महत्त्वपूर्ण ठरेल. संयम आणि शिस्त यामध्ये अधिक लाभदायक ठरेल. सफलता सोपी होईल. साहित्य ते संशोधन असा मुलांचा प्रवास होऊ शकतो.
कर्क राशी ड, ह आद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
गुरुवार, दि. 4 जुलै 2019
भारतीय सौर, 13 आषाढ 1941
मिती आषाढ शुद्ध द्वितीया 19 क. 10 मि.
पुष्य नक्षत्र 26 क. 30 मि. कर्क चंद्र
सूर्योदय 06 क. 7 मि., सूर्यास्त 07 क. 19 मि.
गुरुपुष्यामृत
दिनविशेष
1902 - स्वामी विवेकनंदांचे महानिर्वाण.
1914 - चित्रपट गीतकार, कथा व पटकथाकार सावळराम रावजी पाटील तथा पी. सावळाराम यांचा जन्म.
1977 - मराठी प्रकाशक परिषदेची स्थापना.
1980 - प्रख्यात मराठी कथाकार व कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचे निधन.
1990 - मुंबई उपनगर जिल्ह्याची स्थापना.
1991 - पृथ्वी क्षेपणास्त्राची चौथी चाचणी.
1999 - अभिनेते वसंत शिंदे यांचे निधन. त्यांना कलागौरव, चित्रभूषण, बालगंधर्व या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.